शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

Pooja Chavan Suicide Case: भाजपा आमदाराला धमक्यांचे फोन; ठाकरे सरकारवर लावले गंभीर आरोप

By प्रविण मरगळे | Updated: February 15, 2021 12:48 IST

BJP MLA Atul Bhatkhalkar receives threatening phone call in Pooja Chavan suicide case: काही दिवसांपूर्वीच अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, राज्यातील मंत्र्यांची नावेच जर अशाप्रकारे महिला अत्याचारांबाबत समोर येत असतील तर महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत का? असा प्रश्न अतुल भातखळकरांनी उपस्थित केला होता.

ठळक मुद्देया मंत्र्याचे आणि आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा सोशल मीडियात चर्चेत आहे. मला धमक्यांचे फोन येतायेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहेधमक्यांनी बंधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावं

मुंबई – परळीतील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या केली, रविवारी मध्यरात्री या तरूणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती, मात्र या तरूणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपाच्या महिला आघाडीने केला होता, त्यानंतर चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी थेट शिवसेना मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांचं नाव घेऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. (Threaten call to BJP MLA Atul Bhatkhalkar in Pooja Chavan Suicide Case, allegation on Thackrey Government)

भाजपा आमदार अतुल भातखळकर(BJP Atul Bhatkhalkar) यांनीही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र पाठवलं होतं. त्यानंतर आता अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर आणखी एक गंभीर आरोप लावला आहे. भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत(Pooja Chavan Suicide Case) आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येतायेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच धमक्यांनी बंधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावं असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, या पत्रात म्हटलं होतं की, शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे या प्रकरणी नाव पुढे आले आहे, या मंत्र्याचे आणि आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा सोशल मीडियात चर्चेत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी मुख्यमत्र्यांना केली होती.

महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत का?

काही दिवसांपूर्वी एका मंत्र्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करण्यात आली होती, हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका मंत्र्याचे नाव थेट युवतीच्या आत्महत्येशी जोडले जात आहे. इतक्या गंभीर प्रकरणांमध्ये आपल्याच मंत्री मंडळातील सहकाऱ्यांची नावे पुढे येत असताना आपण डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसला आहात अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांची नावेच जर अशाप्रकारे महिला अत्याचारांबाबत समोर येत असतील तर महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत का? असा प्रश्न अतुल भातखळकरांनी उपस्थित केला होता.

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSuicideआत्महत्याBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरे