शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

"पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:35 PM

pooja chavan suicide : भाजपची संजय राठोड यांच्यावर टीका

ठळक मुद्देपोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल,असं म्हणत भाजपची संजय राठोडांवर टीकासोमवारी चित्रा वाघ यांनीही पोलिसांना सोपवलं होतं निवेदन

पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर गेले पंधरा दिवस माध्यमांपासून दूर असलेले राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगळवारी २३ फेब्रुवारीला पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या पुढे आले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सहपरिवार दर्शन घेणे व त्यानंतर यवतमाळात कोरोनाची आढावा बैठक घेणे असा त्याचा मंगळवारचा अधिकृत कार्यक्रम होता. दरम्यान यावरून आता भाजपनं त्यांच्यावर निशाणा साधला आहे."पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?," असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राठोड यांच्यावर टीका केली. "युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव असलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मुख्यमंत्री गप्प. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात. सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, मुख्यमंत्री किमान कोरोनाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरी करणार का ?," असा सवालही त्यांनी केला.पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. तिने आत्महत्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला असे पोलिसांनी म्हटले आहे. तिच्या आईवडिलांनी आमची कोणाबाबत तक्रार नाही असा जबाब दिला आहे. मुळची परळी येथील असलेली पूजा चव्हाण, इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात गेली आणि तिने आत्महत्या केल्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली आहे.चित्रा वाघ यांनी दिलं पोलिसांना निवेदनप्रसिद्धीमाध्यमातून समोर आलेल्या बातम्यांनुसार तिची आजी, भाऊ यांनी मात्र आमची मुलगी आत्महत्या करणारी नव्हती म्हणत ही हत्या असून याची चौकशी व्हावी ही मागणी केली. दरम्यान १२ ऑडियो क्लीप बाहेर आल्या, ज्यात पूजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून तर आत्महत्येनंतर दरवाजा तोड. पण तिचा मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतच संभाषण आहे. हा आवाज दुसरा तिसरा कोण नसून राज्याचा शिवसेनेचा वनमंत्री संजय राठोड यांचा आहे. काही फोटो ही आहेत ज्यात पूजा ही संजय राठोडच्या संपर्कात होती हेही दिसतंय. इतके ढळढळीत पुरावे असतानाही पुणे पोलीस मात्र संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही, असं वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण