शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Pooja Chavan Death Case: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले शरद पवार; संजय राठोडांना शक्तिप्रदर्शन महागात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 09:04 IST

Pooja Chavan Death Case: राठोड यांच्या पोहरादेवीतील शक्तिप्रदर्शनानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राठोड यांच्याबद्दल नाराजी व्यक्त

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं समजतं. काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.राठाेडांचे शक्तिप्रदर्शन, पण नियमांचे उल्लंघन; आरोप खोटे असल्याचा पाेहरादेवीत दावासंजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं.पाेहरादेवीत हजारोंची गर्दी, जमावबंदी आदेशाला फाटा; तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशमुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेशकोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरेंनी रविवारी (२१ फेब्रुवारी) दिला. मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड यांच्या समर्थकांनी हरताळ फासला. पोहरादेवी परिसरात केवळ ५० जणांना जमण्याची परवानगी असताना हजारो लोक उपस्थित होते. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केलं. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंची मूकसंमती, लपवाछपवीचं काम; भाजपचा थेट आरोप

पोहरादेवीच्या दर्शनानंतर काय म्हणाले संजय राठोड?पूजा प्रकरणाच्या आड समाजात बदनामी करण्याचे घाणेरडे राजकारण खेळून तीस वर्षांचे राजकीय जीवन संपवण्याचा घाट घातला जात असल्याचे राठोड यांनी सांगितले.  विराेधकांकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून त्यात सर्व बाबी स्पष्ट होतील, असे सांगतानाच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, अशी विनंती त्यांनी केली. माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतातसोशल मीडियावर व्हायरल पूजासोबतच्या फोटोंबाबत राठोड म्हणाले, गेली ३० वर्षे सामाजिक-राजकीय जीवनात आहे. यानिमित्ताने अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. मी १५ दिवस गायब नव्हतो. मुंबईतील फ्लॅटवरून शासकीय कामकाज करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवा, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPooja Chavanपूजा चव्हाण