शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Karnataka Politics: कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय संकट; मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात

By प्रविण मरगळे | Published: October 20, 2020 1:39 PM

CM BS Yediyurappa News: येडियुरप्पाऐवजी आता उत्तर कर्नाटकातील कुणालाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी विधानसभेतील आमदार यतनाल यांनी केली आहे

ठळक मुद्देसहा महिन्यापूर्वीही येडियुरप्पा यांच्याविरोधात २० आमदारांनी मोर्चा उघडला होताराज्यातील बहुतांश नेते मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर समाधानी नाही असा दावा येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री बनले असून उत्तर कर्नाटकातील १०० आमदारांनी त्यांना ते पद दिलं आहे

बंगळुरु - कर्नाटकमधील भाजपाचे आमदार बसनगौडा पी यतनाल यांनी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करत राज्यात मुख्यमंत्री बदलासाठी आघाडी उघडली आहे. राज्यातील विजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार यतनाल यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश नेते मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर समाधानी नाही असा दावा त्यांनी केला आहे.

येडियुरप्पाऐवजी आता उत्तर कर्नाटकातील कुणालाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी विधानसभेतील आमदार यतनाल यांनी केली आहे. यतनाल म्हणाले, राज्याचे बहुतेक वरिष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर खूश नसल्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलले जातील, पुढचे मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकचे असतील असं पीएम मोदींनीही म्हटलं आहे. येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री बनले असून उत्तर कर्नाटकातील १०० आमदारांनी त्यांना ते पद दिलं आहे असा दावा त्यांनी केला.

 

येडियुरप्पा यांच्या कामावर उत्तर कर्नाटकचे आमदार संतप्त

कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर डी कुमारस्वामी यांचे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्याने तयार झाले. पण नंतर सरकारमध्ये सहभागी झालेल्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत पक्षांतर केल्यानं कुमारस्वामी सरकार कोसळलं, राज्यात भाजपाचं सरकार आलं. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री केले गेले होते, परंतु भाजपाचा एक मोठा गट  येडियुरप्पा यांच्यावर बऱ्याच काळापासून नाराज आहे असं बोललं जातं.

सहा महिन्यापूर्वीही येडियुरप्पा यांच्याविरोधात २० आमदारांनी मोर्चा उघडला होता. नाराज असलेल्या आमदारांनी उमेश कत्ती यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याची मागणी केली होती. कत्ती हे आठवेळा आमदार राहिलेले आहेत. याशिवाय उमेश कत्ती यांचे भाऊ रमेश कत्ती यांना राज्यसभेवर पाठविण्याच यावे अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केली होती. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जरी राज्यसभेचे वृत्त फेटाळले असले तरीही उमेश कत्ती यांनी भेटीचे कारण जगजाहीर केले आहे. येडीयुराप्पांनी  माझ्या भावाला राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. याचीच आठवण करून देण्यासाठी रमेश कत्ती येडियुराप्पांना भेटण्यासाठी गेले होते, असे उमेश कत्ती म्हणाले होते.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पा