शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

"पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे एका शिवसेना नेत्यामध्ये आर्थिक संबंध", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:00 PM

Sachin vaze has financial ties with a Shiv Sena leader : न्यायालयाने सचिन वाझे यांचा अटकपूर्वक जामीन नाकारला असतांनाही पोलीस कसली वाट पाहत आहेत.वाझे यांना अटक का केली जातं नाही. असा सवाल किरीट  सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.

ठाणे : सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin vaze) आणि एका शिवसेना नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. असा गोप्यस्फ़ोट भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांनी शनिवारी ठाण्यात केला. मनसूख हिरेन यांच्या कुटुंबीयांची सोमय्या यांनी शनिवारी तिसऱ्यांदा भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हें सांगितलं. वाझे हा मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांचा प्रवक्ता असल्याने त्याला वाचविल जातं असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. ("Police officer Sachin vaze has financial ties with a Shiv Sena leader", a serious allegation made by Kirit Somaiya)न्यायालयाने सचिन वाझे यांचा अटकपूर्वक जामीन नाकारला असतांनाही पोलीस कसली वाट पाहत आहेत.वाझे यांना अटक का केली जातं नाही. असा सवाल किरीट  सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. वाझे यांना लोकांना मारण्याचं लायन्स मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी दिलं आहे का?असा सवालही सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्री यांची हिरेन प्रकरणातील वागणूक ही महाराष्ट्राला लाज वाटणारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चोकशी  झाल्यानंतर मोठं कारस्थान उघडं होईल. त्यातून समजेल की उध्द्वव ठाकरे यांनी वाझे यांना का वाचवलं. सचिन वाझे आणि शिवसेनेच्या एका नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. असा आरोप करताना लवकरच त्याचे नाव उघडं होईल असं सोमय्या म्हणाले. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह हें ज्या प्रकारे वाझे यांचं प्रकरण हातळत आहे. त्याबद्दल त्यांनाही जाब विचारण्याची गरज असल्याचं सोमय्या पुढे म्हणाले. तसेच  मृत मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची या प्रकरणाची सखोल चोकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेShiv SenaशिवसेनाKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाPoliticsराजकारण