शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

Pegasus spyware: नरेंद्र मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळात फोन टॅपिंग झाली, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:07 IST

Pegasus spyware attack: केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे

ठळक मुद्दे'भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही'

नवी दिल्ली: सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात फोन टॅपिंग प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ माजलाय. केंद्र सरकारने इस्रायलच्या पेगासस(Pegasus spyware) या सॉफ्टवेअरद्वारे फोन टॅप केल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. दरम्यान, या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी भाष्य केलं आहे. 'भाजप सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, उलट मनमोहन सिंग यांच्याच काळात फोन टॅप झाले', असा दावा फडणवीसांनी केलाय. 

पेगसासद्वारे भारतातील अनेक पत्रकार, नेते आणि उद्योजकांचे फोन टॅप केल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यांनी केला. यासंबंधी बातम्या समोर आल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. 'फोन टॅपिंग नरेंद्र मोदींच्या काळात नाही, तर तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाली, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना नरेंद्र मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे. पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मनमोहन सिंगांकडून समर्थनफडणवीस पुढे म्हणाले की, भारतातील टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळ फोन टॅपिंग करण्याची गरजच नाही. सबंधित विभागानं अश्या बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. समजावादी पार्टीचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, आणि जे काम झालंय ते लिगली झालंय, अस त्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

देशाच्या बदनामीचा अजेंडाफडणवीस पुढे म्हणाले की, पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण चर्चा फक्त भारताची होत आहे. हे जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून होत आहे. एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग मिळतीये आणि त्यातून एक बदनामीचा अजेंडा राबवला जातोय. हे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे,  असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस