Pegasus row: ते '5' अधिकारी इस्त्रायल दौऱ्यावर कशासाठी गेलेले; कृषीसाठी नाही तर या '10' कामांसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 10:33 PM2021-07-21T22:33:38+5:302021-07-21T22:39:09+5:30

Matralay officers Israel tour info out on Pegasus row: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा शेती आणि तंत्रज्ञान याबाबतची माहिती घेण्यासाठी होता, असे म्हटले होते. मात्र, हा दौरा शेतीसंबंधी कामांसाठी नव्हता, तर दुसऱ्याच कामांसाठी होता अशी माहिती समोर आली आहे. 

Pegasus row: Why did DGIPR officers go on a tour of Israel; Not for agriculture but for these '10' works ... | Pegasus row: ते '5' अधिकारी इस्त्रायल दौऱ्यावर कशासाठी गेलेले; कृषीसाठी नाही तर या '10' कामांसाठी...

Pegasus row: ते '5' अधिकारी इस्त्रायल दौऱ्यावर कशासाठी गेलेले; कृषीसाठी नाही तर या '10' कामांसाठी...

Next

विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना पाच अधिकारी इस्त्रायलच्या (Israel tour) दौऱ्यावर गेले होते. काही दिवसांपूर्वी कथित पेगासस फोन टॅपिंगचा गौप्यस्फोट झाल्याने हे अधिकारी नेमक्या याच काळात इस्त्रायलला का गेले होते? या मागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारचा काही हेतू नव्हता ना, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे ठाकरे सरकारने याची माहिती मागविली होती. (why Maharashtra Mantralay officers visit Israel in Devendra Fadanvis government time? information Out.)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा शेती आणि तंत्रज्ञान याबाबतची माहिती घेण्यासाठी होता, असे म्हटले होते. मात्र, हा दौरा शेतीसंबंधी कामांसाठी नव्हता, तर दुसऱ्याच कामांसाठी होता अशी माहिती समोर आली आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. एकत्र निवडणूक लढलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुमत मिळालं. मात्र मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला. ख्यमंत्रिपदाचा शब्द भाजप पाळत नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली. तर तसा कोणताही शब्द दिलाच नसल्याचं भाजपचं म्हणणं होतं. यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. शिवसेनेनं थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात सत्ता स्थापन केली. गासस स्पायवेअरच्या माध्यमातून अनेक केंद्रीय मंत्री, न्यायमूर्ती आणि पत्रकारांबद्दलची गोपनीय तपशील त्यांच्या फोनमधून गोळा करण्यात येत असल्याची माहिती समोर आल्यानं देशात खळबळ उडाली आहे. पेगासस यंत्रणा इस्रायलची आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना ५ अधिकारी इस्रायलच्याच दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे संशय वाढला आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं होतं.

आता हे अधिकारी तिकडे नेमके काय करायला गेले होते, ते समोर आले आहे. सरकारमधील जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स काय ते समजून घेणे, वेब मिडीया वापराच्या नव्या मार्गाचा अभ्यास, सायबर गुन्हे याबद्दल जागृती कशी करावी, अशा 10 गोष्टींचा समावेश आहे. 

  • सरकारमधील जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स काय ते समजून घेणे
  • वेब मिडीया वापराचे नव्या मार्गाचा अभ्यास
  • डिजीटल मार्केटिंग टूलच्या वापरासंबंधी माहिती मिळवणे
  • सरकारसाठी चांगला मिडीया प्लॅन तयार करण्याचं नवं तंत्र आत्मसात करणे
  • स्मार्ट सिटीमध्ये सरकारी जनसंपर्काचा वापर कसा करावा
  • लोकांमध्ये सायबर गुन्ह्य़ांबद्दल जागृती कशी करावी
  • पर्यटनात जनसंपर्काचा वापर प्रभावीपणे कसा व्हावा
  • नवीन माध्यमाचा ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न कसा करावा
  • नवनव्या येणाऱ्या माध्यमांच्या वापरा संदर्भात अभ्यास
  • आपत्कालीन परिस्थितीत माध्यमांचा वापर कसा करावा

Web Title: Pegasus row: Why did DGIPR officers go on a tour of Israel; Not for agriculture but for these '10' works ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app