शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 10:28 IST

Pankaja munde supporter meeting in mumbai: वरळीत पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीत शेकडोच्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते जमले होते.

ठळक मुद्दे माझा नेता मोदी... माझा नेता अमित शाह...

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे बीडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. नाराज पदाधिकाऱ्यंची समजुत काढण्यासाठी मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. कोरोना नियमांना पायदळी तुडव त्या ठिकाणी शेकडो पदाधिकारी जमले होते. यानंतर आता गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवडी राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आले. यानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचे सूर पसरले आणि 70 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यानंतर पंकजा यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कार्यालयात बैठक बोलावली. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा विसर पडला. यानंतर आता गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पण, नंतर सर्वांना नोटीस देऊन सोडण्यात आले.

माझा नेता मोदी... माझा नेता अमित शाह...पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवतानाच महाराष्ट्र भाजपातील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यावेळी, आपण धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करणार जोवर शक्य आहे, असे म्हणत माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व जे पी नड्डा आहेत आणि त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, असे पंकजा यांनी म्हटले आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. आपल्याला काय, मला माझ्यासाठी काही नको. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणे शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचे नाव आले, काय बिघडले? मी कोण आहे…? तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका”, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.

ते त्यांनाच लखलाभ असो

कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचे त्यांनीच ठरवावे. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचेच आणि महाभारतही तिकडचेच, ते त्यांनाच लखलाभ असो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे कार्यकर्ते नाराज असल्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील वाद चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा सुरू होती. अलीकडेच पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरणही दिले होते.

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपाMumbaiमुंबईCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाJ P Naddaजगत प्रकाश नड्डा