शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

Pandharpur Election Results Live: “पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 17:16 IST

पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. अद्याप त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. तत्पूर्वी भाजपाकडून ठाकरे सरकारच्या नेत्यांवर टीकास्त्र सुरू झालं आहे.  

ठळक मुद्देराष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची उंची नाहीमहाविकास आघाडीच्या नेत्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचण्याची सवय आहेभाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर बाजी मारत विजयी पताका फडकवला आहे. समाधान आवताडे यांचा ३ हजार ७१६ मतांनी विजय झाला आहे. भाजपा उमेदवाराच्या घराबाहेर जल्लोष सुरू आहे.(BJP MLC Gopichand Padalkar Reaction on Pandharpur by Election Result)  

 या निवडणुकीच्या निकालावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. पडळकर म्हणाले की, पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?” नुतन आमदार समाधान आवताडेंचं ३ हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जय मल्हार असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची उंची नाही. त्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचण्याची सवय आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या आमदारांना भाजपा एकच पर्याय

पंढरपुर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले तरीही लोकानी नाकारले. हा महाविकास आघाडीच्या आमदारांना संदेश आहे. येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजपा हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे असं सांगत भाजपा आमदार नितेश राणेंनी सत्ताधारी आमदारांना खुली ऑफर दिली आहे.

चंदक्रांत पाटलांनीही साधला निशाणा

मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला. दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्ते आणि परिचारक आवताडे यांच्या एकीला दिलं.

टॅग्स :Pandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021BJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस