शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

Pandharpur Byelection: अभिजित बिचुकलेंनी शड्डू ठोकला; आता पंढपुरातून पोटनिवडणूक लढविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 1:12 PM

Pandharpur Byelection news: राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणतीही निवडणूक लागली की भर अर्ज आणि हो उभा, अशा काहीशा पवित्र्यात असलेले व नेहमी चर्चेत राहणारे मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (abhijeet bichukale) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Abhijit bichukale will contest pandharpur byelection. )

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. थोड्याच वेळात ते अर्जदेखील दाखल करणार आहेत. एकीकडे भावनिक राजकारण विरोधात भाजपा असा सामना असताना ही पोटनिवडणूक आणखी एका व्यक्तीमुळे चर्चेत येणार आहे.  मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.

विठुरायाच्या नगरीची नेत्यांनी केलेली दुरवस्था बघवत नाही आणि राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी पंढरपूर पोट निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

मंगळवेढा येथील पाणीप्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही असा सवाल करत आपण या निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही  बिचुकले यांनी व्यक्त केला.

बिचुकले हे विविध कारणांनी चर्चेत असतात. राज्यसभा खासदार उदयन राजेना देखील लोकसभा निवडणुकीत आव्हान दिले होते. विधानसभेला त्यांनी युवा सेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील निवडणूक लढविली होती. यानंतर त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. मात्र तेव्हा पत्नीचे नाव मतदार यादीत होते, परंतु त्यांचे नाव नसल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. अनेकदा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, तरीदेखील बिचुकले यांची निवडणूक लढविण्याची हौस कायम आहे.

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेPandharpurपंढरपूरpandharpur-acपंढरपूर