शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंचे आझाद मैदानात आंदोलन सुरु, हजारो मराठा आंदोलक मुंबईत
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
4
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
5
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
6
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
7
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
8
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
9
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
10
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
11
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
12
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
13
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
14
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
15
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
16
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
17
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
18
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
19
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

ऑक्सिजन वाद: 'मग आता संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार का ?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:35 IST

Chitra Wagh responds to Sanjay Raut: 'केंद्र सरकारवर खोटं बोलत आहे, त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे'

ठळक मुद्दे'राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.'

मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही' असे लिखीत व्यक्तव्य त्यांनी संसदेत केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांना भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी उत्तर दिलं आहे. 

ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नाही अस प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिलयं. मग, राज्य सरकारवरही राऊतजी खटला भरणार आहेत का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.

काय म्हणाले होते संजय राऊत ?एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीतदरम्यान संजय राउत म्हणाले, "केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ? केंद्र सरकार खोटं बोलत आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा,"अशी मागणी राऊतांनी केली.    

काय म्हणाल्या डॉ. भारती पवार ?काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी मंगळवारी राज्यसभेत प्रश्न विचारला की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव गेलाय का ? त्या प्रश्नाला उत्तर देताना नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, "आरोग्य राज्यांचा विषय आहे. मृतांचा अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे आरोग्य मंत्रालयाला देत असतात. राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेत गोंधळ सुरू झाला. काँग्रेसने सरकारवर निशाणा साधत सरकारला अंधळी आणि असंवेदनशील म्हटले.  

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाcongressकाँग्रेसChitra Waghचित्रा वाघcorona virusकोरोना वायरस बातम्या