शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हाथरस घटनेतील आरोपींचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटी देणार; काँग्रेस नेत्याची घोषणा

By प्रविण मरगळे | Published: October 04, 2020 8:52 PM

Hathras gangrape, Congress Leader Nijam malik News: या व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी तात्काळ निजाम मलिक यांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निजाम मलिक यांचा एक व्हिडीओ व्हायरलहाथरस घटनेतील आरोपींचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस जाहीर केलेव्हायरल व्हिडीओनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस नेत्याला केली अटक

लखनऊ – उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरुन देशात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र आता या घटनेवरुन राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. हाथरसमध्ये एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणात ४ आरोपींना पोलिसांना पकडलं आहे. सध्या घटनेची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने एसआयटी नेमली होती, त्याचसोबत याचा तपास सीबीआयने करावा अशी शिफारसही उत्तर प्रदेश सरकारने केली आहे.

हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच उत्तर प्रदेश जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निजाम मलिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत निजाम मलिक हाथरस घटनेतील आरोपींचे शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस आमच्या समाजाकडून देण्यात येईल असं जाहीर केले आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी तात्काळ निजाम मलिक यांना ताब्यात घेतले आहे.

भाजपाच्या माजी आमदाराने आयोजित केली पंचायत, पीडित कुटंबावरच केले आरोप

आज हाथरसमध्ये एक पंचायतही बोलावण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार ही पंचायत भाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पलहवान यांनी बोलावली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी योगी सरकारने जे आदेश दिले आहेत त्यामुळे प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल, असा दावा या पंचायतीत करण्यात आला. ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर बलात्कार झाल्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आले, ही माहिती चुकीची आहे, असे राजवीर सिंह पलहवान यांनी सांगितले. राजवीर सिंह म्हणाले की, ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ व्हायला हवं. यासाठी सर्वांची नार्को चाचणी झाली पाहिजे. सीबीआय तपासाचा आदेश आला पाहिजे. आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. आता या पंचातीमध्ये जमलेले लोक प्रदेश सरकारच्या निर्णयावर समाधानी आहेत, असे राजवीर सिंह यांनी सांगितले. सरकारचे आभार मानण्यासाठी ही पंचायत बोलावली आहे असेही ते पुढे म्हणाले.

१४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आले होते. मात्र त्यावेळी माध्यमांनी दखल घेतली नव्हती. पण नंतर प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले. तीन दिवसांनंतर साक्ष बदलवण्यात आली. त्यानंतर दर तीन दिवसांनी साक्षी बदलत गेल्या आणि माध्यमे टीआरपीसाठी बातम्या चालवत राहिले, असे राजवीर सिंह म्हणाले. दरम्यान, राजवीर सिंह यांनी सामूहिक बलात्काराचे वृत्तही फेटाळून लावले. मागासवर्गीय समाजातील एका तरुणीला मारहाण झाल्याची खोटी माहिती पसरवून हाथरसला बदनाम करण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे.

हाथरस घटनेवरुन बॅकफूटवर असलेल्या मुख्यमंत्री योगींचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर गंभीर आरोप

योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर

हाथरसमधील मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येनंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले होते. विरोधी पक्षांशिवाय भाजपामधील नेत्यांनीही पीडितेचा मृतदेह जाळल्याच्या प्रकरणाबाबत योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी शनिवारीही पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी हाथरस येथे पोहोचले, तेव्हा मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केली होती. काँग्रेसशिवाय समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षानेही योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हाथरस घटनेवरुन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र

जातीय दंगल भडकवण्याचं षडयंत्र; मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

विरोधक उत्तर प्रदेशात जातीय दंगल पेटवण्याचं षडयंत्र रचत आहेत. राज्यातील विकास कामं रोखण्यासाठी विरोधक असं राजकारण करत आहेत. ज्यांना विकास होत असलेला आवडत नाहीत असे लोक देशात आणि राज्यात जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दंगलीच्या माध्यमातून राज्यातील विकास थांबेल आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची संधी मिळेल असं विरोधकांना वाटत आहे असा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तसेच या षडयंत्रांविरोधात पूर्ण ताकदीनं आपल्याला लढून विकासप्रक्रिया पुढे घेऊन जावी लागेल असंही ते म्हणाले आहेत.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारcongressकाँग्रेसPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथ