"Opposition Raising Small Issue"; Controversial statement of BJP minister on Hathras gangrape case | “विरोधक करतायेत छोट्या मुद्द्याचं राजकारण”; हाथरस प्रकरणावरुन भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

“विरोधक करतायेत छोट्या मुद्द्याचं राजकारण”; हाथरस प्रकरणावरुन भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

ठळक मुद्देविरोधकांकडे सध्या कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे अशा छोट्या-मोट्या मुद्द्यांवर ते राजकारण करत आहे. सरकार निर्णय घेतेय. विरोधकांकडे मुद्दा नाही. त्यामुळे हाथरस प्रकरणावरुन राजकारण सुरु आहे. जनहिताचे कोणतेही मुद्दे विरोधकांकडे नाहीत. कायदा आपलं काम करत आहे.

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेने एकीकडे संपूर्ण देश हादरला असताना त्याच भाजपा मंत्र्याने या घटनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे. हाथरस प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. योगी सरकारच्या कायदा सुव्यवस्थेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हाथरसच्या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यातच भाजपा राज्यमंत्री अजित पाल यांनी हाथरस घटना हा छोटा मुद्दा असल्याचं वादग्रस्त विधान केले आहे. अजित पाल म्हणाले की, विरोधकांकडे सध्या कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे अशा छोट्या-मोट्या मुद्द्यांवर ते राजकारण करत आहे. जनहिताचे कोणतेही मुद्दे विरोधकांकडे नाहीत. कायदा आपलं काम करत आहे. सरकार निर्णय घेतेय. विरोधकांकडे मुद्दा नाही. त्यामुळे हाथरस प्रकरणावरुन राजकारण सुरु आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे असं काही झालं नाही. तपासात सगळं सत्य बाहेर येईल असं त्यांनी सांगितले आहे.

बलात्कार झाला नाही शवचिकित्सा निष्कर्ष

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे तिच्या शवचिकित्सेतून आढळून आले आहे. ही माहिती त्या राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांतकुमार यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, या दलित मुलीचा मृत्यू गळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमुद करण्यात आले आहे. तिच्या शवचिकित्सेमध्ये वीयार्चे अंश आढळून आले नाहीत.

शवविच्छेदन अहवालात काय ?

बलात्काराचा उल्लेख नाही

पीडितेच्या मणक्याला दुखापत

तरुणीच्या मानेलाही दुखापत

पीडितेला हार्ट अटॅक आला होता

ब्लड इन्फेक्शन झाले होते

२९ सप्टेंबर सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू

काय आहे प्रकरण?

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्‍या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले

Web Title: "Opposition Raising Small Issue"; Controversial statement of BJP minister on Hathras gangrape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.