शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेसचा विचारच देशाला वाचवू शकतो -  नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:09 IST

Nana Patole : देशाला केवळ काँग्रेसचा विचारच वाचवू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारंजा येथे केले.

कारंजा लाड : काँग्रेस पक्षाचा विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आहे. देशभरात सध्या कठीण परिस्थिती निर्माण झाली असून, आता देशाला केवळ काँग्रेसचा विचारच वाचवू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी कारंजा येथे ९ जून रोजी आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केले.अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ.वजाहत मिर्झा, आ.कुणाल पाटील, माजी आ.नातिकोद्दीन खतीब, निरीक्षक अतुल लोंडे, आमदार अमित झनक, जिल्हा निरीक्षक प्रकाश साबळे, जिल्हाध्यक्ष एड. दिलीप सरनाईक, मो.युसूफ पुंजानी, जिल्हा प्रवक्ता दिलीप भोजराज आदींची उपस्थिती होती. नाना पटोले म्हणाले की, कोरोना काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या कामाची शाब्बासकी देण्यासाठी तसेच तिसऱ्या लाटेत करावयाच्या उपाययोजनांच्या आढावा घेऊन शासनाच्या माध्यमातून प्रश्‍न सोडवण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार सत्तेत आल्यापासून धान्याची भीक देत आहे. द्यायचेच असेल तर पैसे द्यावे.  नुकतेच काँग्रेसच्यावतीने राज्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. केंद्र सरकार पेट्रोलच्या मूळ किमतीवर १८ रुपये प्रती लिटर रस्ते विकासाचा कर घेते. पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले असून डिझेलही लवकरच शतक गाठणार आहे. वाजपेयी सरकार ते डॉ. मनमोहनसिंग सरकारपर्यंत १ रुपया रस्ते विकासाचा कर घेतल्या जात होता. त्यावेळी १९ हजार कोटी रुपये केंद्राच्या तिजोरीत जमा होत होते, असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने खासगीकरण करण्याचा सपाटा लावला. शासकीय कंत्राटदारांकडून इस्टिमेट केले जात आहे. रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा घणाघाती आरोपही पटोले यांनी केला.  भाजपने ओबीसींचे नुकसान  केल्याने त्यांना ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्याचा अधिकार नसल्याचेही पटोले म्हणाले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष रमेश लांडकर, शहराध्यक्ष हमीद शेख यांनी पुढाकार घेतला. संचालन शमीम फरहत यांनी तर आभार अ‍ॅड. फिरोज शेकूवाले यांनी मानले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसKaranjaकारंजा