शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 9:39 AM

बिहारमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू; एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळालं. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या आहेत. आज पाटण्यात एनडीएच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीश कुमार यांची गटनेते म्हणून औपचारिक निवड होईल. या बैठकीत भाजपचे दिग्गज नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. याशिवाय बिहार विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसदेखील सहभागी होतील.‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’नितीश कुमार यांची एनडीएचे गटनेते म्हणून निवड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला एनडीएचे चारही घटक पक्षांचे (जेडीयू, भाजप, हम, व्हीआयपी) नेते उपस्थित होते. एनडीएची पुढील बैठक रविवारी होणार असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे आज होणारी बैठक अतिशय महत्त्वाची आहे. बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; एनडीएत सामील होण्याची शक्यताभाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्षभाजपनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारचं नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वानं स्पष्ट केलं आहे.कंदील, कमळ आणि बिहारचे महाराष्ट्र कनेक्शननितीश कुमार यांची कसोटी लागणारनितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRajnath Singhराजनाथ सिंह