भुसावळात राष्ट्रवादीत नाराजी; मंत्री जयंत पाटलांचा ताफा अडविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 21:20 IST2021-02-12T21:16:06+5:302021-02-12T21:20:26+5:30
NCP News : परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील हे शुक्रवारी सायंकाळी वाहनांच्या ताफ्यासह भुसावळात पोहचले.

भुसावळात राष्ट्रवादीत नाराजी; मंत्री जयंत पाटलांचा ताफा अडविला
भुसावळ : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावरील नाराजीविरुद्ध पीआरपीचे पदाधिकारी जगन सोनवणे व पुष्पा सोनवणे यांनी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा ताफा अडविला आणि संतोष चौधरी विरुद्ध घोषणाबाजी करीत निवेदन केले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी महात्मा गांधी चौकात घडला.
परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील हे शुक्रवारी सायंकाळी वाहनांच्या ताफ्यासह भुसावळात पोहचले. महात्मा गांधी पुतळयाजवळ सोनवणे व त्यांच्या कार्यकर्ते यांनी निवेदन देण्यासाठी वाहने अडविली. त्यावेळी सोनवणे हे पाटील यांच्याशी चर्चा करीत असतानाच काही कार्यकर्ते वाहनासमोर झोपले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी सोनवणे यांची समजूत काढली आणि ते पुढील कार्यक्रमासाठी तेली मंगल कार्यालयाकडे रवाना झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तिथे उपस्थित पोलिसांची तारांबळ उडाली.