शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते?; जयंत पाटलांनी सांगितलं 'गोड' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 16:24 IST

पवार-शहा भेटीच्या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचं वृत्त येताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा केला. तर खुद्द अमित शहांनी 'सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगत येत नाही' असं म्हणत सस्पेन्स वाढवला. आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोलाशरद पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही. भाजपला केवळ सत्तेची स्वप्नं पडत आहेत. पण महाविकास आघाडी भक्कम आहे, असं पाटील म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील अमित शहा- शरद पवार भेटीच्या वृतांमध्ये तथ्य नाही. साखर उद्योगातील परिषदेसाठी पवार साहेब अहमदाबादला गेले होते, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. पवार-शहा यांच्या भेटीच्या बातम्या उठवण्याचं काम भाजपकडून सतत करत आहे. आमची महाविकास आघाडी तोडण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न सुरू आहेत, असं पाटील यांनी सांगितलं. याआधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीदेखील अशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर भाजप नेत्यांनी मात्र केंद्रातील नेतृत्वानं आदेश दिल्यास अंमलबजावणी करू, अशी भूमिका घेतली.केंद्रानं छोट्या बचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय १२ तासांत मागे घेतला. त्यावरूनही पाटील यांनी केंद्राला लक्ष्य केलं. एखादा निर्णय हा विचार करून घेतला जातो. तो काही असाच होत नाही. फाईलवर निर्णय झाला असणार. पाच राज्यांच्या निवडणुका बघून त्या राज्यांत फटका बसेल, या भीतीने हा निर्णय मागे घेतला, असं पाटील म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलAmit Shahअमित शहाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस