शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'वाकडीचं रिंगण दाखवून राजकारणातील हीन प्रवृत्ती ठेचण्याची पंढरपूरकरांना संधी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 19:15 IST

भगीरथ नाना भारत नानांचे केवळ रक्ताचे नाही तर त्यांच्या विचारांचे आणि पंढरपूरच्या विकासाच्या स्वप्नाचे वारसदार आहेत : धनंजय मुंडे

"भारत नाना आपल्याला अर्ध्यात सोडून जातील आणि त्यांच्या जागी त्यांच्या मुलाचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. नानांनी मला नेहमीच वडिलकीची माया दिली. आज त्यांच्या जागी पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव भगीरथ दादा उभे आहेत, भगीरथ दादा नानांचे केवळ रक्ताचे नाही तर नानांच्या विचारांचे आणि या भागाच्या विकासाचे जे स्वप्न नानांनी पाहिले त्या स्वप्नाचे देखील वारसदार आहेत, या वारसदारास मी आशीर्वाद मागायला आलो आहे," अशी भावनिक साद सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाकडी येथील प्रचार सभेत घातली आहे.पंढरपूर तालुक्यातील वाकडी येथे सर्व वारकरी दिंड्या विसाव्यास येतात, आज गुढीपाडव्याच्या दिवशी वाकडी येथे प्रचारास येणे हा माझ्यासाठी भाग्यवह योगायोग आहे. ही निवडणूक पक्ष विरुद्ध पक्ष अशी नसून आता सत्य विरुद्ध प्रत्येक गोष्टीत हीन दर्जाचे राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती अशी आहे आणि या अपप्रवृत्तींना इथल्या जनतेनेच आता 'रिंगण' दाखवावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले."मी कच्च्या गुरूचा चेला नाही, असं भारत नाना म्हणायचे, मी देखील कच्च्या गुरूचा चेला नाही," असं म्हणत मुंडेंनी विरोधकांचा समाचार घेतला. खा. शरद पवार यांच्या पावसाच्या सभेची आठवण सांगत, काल परवा जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला, त्यांना आमच्या सभांमध्ये पाऊस आला की धसकाच बसतो, अशी मिश्किल टिप्पणी मुंडेंनी केली.

... आणि आम्हाला शेतकरी विरोधक म्हणतात"दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाला बसले आहेत आणि भाजपचे नेते आम्हाला शेतकरी विरोधी म्हणतात! मुळात केंद्रातले सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आणि धनदांडग्यांच्या हिशोबात आहे," अशी टीकाही यावेळी मुंडेंनी केली. सत्ता काबीज करण्याच्या नादात भाजपकडून अत्यंत हीण दर्जाचे राजकारण केले जात आहे. भारत नानांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या विकासाच्या स्वप्नांवर, त्यांच्या कुटुंबावर टीका करणे हे या अपप्रवृत्तींनी सुरू केलं आहे, या अपप्रवृत्ती भगीरथ दादांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन इथल्या जनतेने ठेचून काढाव्यात असे आवाहनही यावेळी धनंजय मुंडे यांनी केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र