शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कोकण बुडत असताना राष्ट्रवादीचे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त, नेटिझन्सची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 9:58 AM

Konkan Rain Update: राज्यात पुरामुळे अशी आणीबाणीची परिस्थिती असताना राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई - गेल्या दोन तीन दिवसांपासून कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यात चिपळूण शहराचा बहुतांश भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. तर मुंबईजवळील बदलापूर, उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भाग जलमय झाला होता. कोल्हापूरमध्येही पुराचे संकट दिसून येत होते. मात्र राज्यात अशी आणीबाणीची परिस्थिती असताना राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. (NCP leader busy partying Eid as Konkan sinks, angry reaction of netizens)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या फौजिया खान यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे  हे उपस्थित होते. दरम्यान, स्नेहभोजन झाल्यानंतर फौजिया खान यांनी ट्विटरवर या स्नेहभोजनाचा फोटो शेअर केला होता. आता या फोटोवरच नेटिझन्सनी टीका सुरू केली आहे. 

राज्यात पुरस्थिती निर्माण झाली असताना आणि कोकणातील चिपळूणमध्ये पुरामुळे आणीबाणी निर्माण झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते स्नेहभोजन करण्यात गुंतले असल्याने नेटिझन्स टीका करत आहेत. हे आहे अनुभवी सरकारच गांभीर्य, तिकडे पुरात लोकांना खायला अन्न नाही पण इकटे पार्ट्या चालू आहेत, अशी टीका काही नेटिझन्सनी केली आहे.  

तर आज तिथे  चिपळूणची  परिस्थिती बघून इथे  जेवण करायचं सुद्धा मन  झालं  नाही. अर्धा महाराष्ट्र आज पाण्याखाली आहे. चिपळूण, कोल्हापूरमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि इथे पार्टी वगैरे  चालू. पावसामध्ये फक्त  निवडणुकीमध्ये भिजायचं, बाकी दिवस जनतेला उगड्यावर सोडून द्यायचं, असा टोलाही एका युझरने लगावला आहे. 

 

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाkonkanकोकणRainपाऊसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार