शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; एका वाक्यात स्पष्टच बोलले

By कुणाल गवाणकर | Published: January 15, 2021 3:47 PM

नामांतरावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस संघर्ष सुरू झाला असताना पवारांचं भाष्य

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना औरंगाबादसाठी संभाजीनगर, तर उस्मानाबादसाठी धाराशिव नाव वापरण्यात येत आहे. याला काँग्रेसनं आक्षेप घेतला असला तरीही मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून तेच शब्द वापरले गेले. त्यामुळे शिवसेना विरुद्ध काँग्रेस सामना पाहायला मिळाला. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. औरंगाबादनंतर आता 'या' जिल्ह्यावरून वातावरण तापणार?; CMOचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषयमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं सीएमओच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर शब्द वापरला गेला. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावलं होतं. मात्र त्यानंतरही CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानात संभाजीनगर म्हटल्यानं सीएमओनं तोच शब्द ट्विटमध्ये वापरला होता.पुढेही हेच करणार; 'संभाजीनगर'वरील थोरातांच्या आक्षेपानंतरही मुख्यमंत्री ठाकरे जोरातदोनच दिवसांपूर्वी सीएमओनं मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देताना उस्मानाबादपुढे धाराशिव शब्द वापरला. शिवसेनेकडून नामांतराचा मुद्दा रेटला जात असताना आणि काँग्रेसकडून त्याला विरोध होत असताना शरद पवार यांनी यावर अगदी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 'आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या विषयाकडे मी गांभीर्यानं पाहत नाही,' असं पवार म्हणाले. CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?

मुख्यमंत्री ठाम, काँग्रेस नाराजमुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत असल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा असलेला विरोध कायम असल्याची भूमिका मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार असल्याचं ठणकावून सांगितलं. 'मी नवीन काय केलंय? आतापर्यंत मी जे बोलत आलोय, बाळासाहेब जे बोलत आलेत, तेच मी बोलतोय, तेच करतोय आणि पुढेही तेच करणार. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या सेक्युलर अजेंड्यात औरंगजेब बसत नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा संभाजीनगर म्हटल्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 'छत्रपती संभाजी महाराज आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र आमचा नामांतराला आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाला विरोध आहे. महाविकास आघाडीनं किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे मतभेदांचे मुद्दे चर्चेतून सोडवू. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पटवून देऊ,' असं थोरात यांनी म्हटलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAurangabad renameऔरंगाबादचे-नामांतर