जुन्या आठवणींना उजाळा, सुप्रिया सुळेंसोबत शरद पवारांची 'मुंबई' सफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 08:50 AM2021-05-08T08:50:45+5:302021-05-08T08:54:21+5:30

sharad pawar : रुग्णालयातून घरी आल्यानंतर शरद पवारांना थोडे बरे वाटावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  त्यांना घेऊन घराबाहेर पडल्या.

ncp chief sharad pawar and mp supriya sule car ride in mumbai after his surgery;facebook live | जुन्या आठवणींना उजाळा, सुप्रिया सुळेंसोबत शरद पवारांची 'मुंबई' सफर!

जुन्या आठवणींना उजाळा, सुप्रिया सुळेंसोबत शरद पवारांची 'मुंबई' सफर!

Next
ठळक मुद्देमुंबईत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गाडीतून फेरफटका मारला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत शरद पवार यांच्याशी संवाद साधला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. रुग्णालयातून घरी आल्यानंतर शरद पवारांना थोडे बरे वाटावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  त्यांना घेऊन घराबाहेर पडल्या. मुंबईत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गाडीतून फेरफटका मारला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live)करत शरद पवार यांच्याशी संवाद साधला. (ncp chief sharad pawar and mp supriya sule car ride in mumbai after surgery; facebook live)

मुंबईत फेरफटका मारताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सध्याची मुंबई आणि पूर्वीची मुंबई या विषयावर गप्पा मारल्या. आधीची मुंबई कशी होती, काळानुसार काय बदलत होते गेले, ते मुंबईत कधी आले, कुठे राहिले, हे सर्व सांगत शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला आहे.

सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील फेसबुक लाईव्ह संवाद 

सुप्रिया सुळे : नमस्कार रितसर परवानगी घेऊन बाहेर पडलोय… लॉकडाऊन आहे याची जाणीव आहे, जबाबदारी आहे.. मी आणि बाबा चेंज म्हणून ड्राईव्हला आलोय, मुंबईमध्ये…

मुंबई किती बदलली, आपण आलो तेव्हाची आणि आताची मुंबई.. आपण 1971 मध्ये आलो ना… मी आणि आई ऑफिशिअली आलो…

शरद पवार : मी साधारणत: ६२-६३ मध्ये काँग्रेसचे युवक सेक्रेटरी म्हणून आलो.. त्यावेळी दादरला खेड गल्ली होती. तिथे सगळे मिल वर्कर होते. पुणे जिल्ह्यातील लोक जास्त होते. आता त्याचं नाव काकासाहेब गाडगीळ लेन असं आहे.. आता तिथे काँग्रेसचं टिळक भवन आहे. तिथे आम्ही राहायचो…. आम्ही तिथे ५ वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो… मी काँग्रेस नेते असे बरेच होतो.. आता बदललंय सगळं.

त्यावेळी मुंबईत तो भाग जो आहे.. तो सामान्य लोकांचा होता… तिथे कोकणातील होते, घाटावरचे होते… कोकणी लोक मोठ्या संख्येने होते… सर्व कष्टकऱ्यांचा, कामगारांचा होता.. लालबाग, परळ वगैरे …

एकत्र येऊन सण साजरे करणे.. जसे कोकणात वेगवेगळे सण आहेत, ते साजरे करायचे… तेव्हा घाटावरचे लोक म्हणायचे… आपण सगळे घाटी होतो.. आपल्याला घाटी म्हणायचे..

आपल्याकडे काही लोक इकडे असायचे… मग गावाकडून कोणी कार्यकर्ता, पाहुणा आला की भागातील लोक सगळे जाऊन त्याला चांगलं जेवण वगैरे देणार, त्याला सिनेमा दाखवणार, तो माणूस गावाकडे जाऊन सांगायचा, काय माझी बडदास्त ठेवलेय, सिनेमा दाखवला, जेवण दिलं वगैरे .. ते लोक खुश होऊन जायचे.. गावाकडे सांगायचे आपले लोक कसे चांगले वागतात वगैरे

ती वेगळी मुंबई होती, आताची वेगळी आहे… ते कल्चर वेगळं होतं.. मुख्य म्हणजे इथला सामान्य माणूस गेला.. मराठी माणूस… आता बहुमजली इमारती आल्या.. समाजकारण बदललंय…

Web Title: ncp chief sharad pawar and mp supriya sule car ride in mumbai after his surgery;facebook live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app