Cabinet reshuffle: मोदींकडून मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात; रमेश पोखरियाल निशंकांसह चौघांना मंत्रिमंडळातून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 01:26 PM2021-07-07T13:26:06+5:302021-07-07T13:36:16+5:30

Narendra Modi Cabinet Reshuffle: मोदी कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला आहे.

Narendra Modi Cabinet Reshuffle: Education minister Ramesh Pokhariyal dropped from Cabinet; debasree chaudhuri, sadanand gauda also | Cabinet reshuffle: मोदींकडून मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात; रमेश पोखरियाल निशंकांसह चौघांना मंत्रिमंडळातून वगळले

Cabinet reshuffle: मोदींकडून मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात; रमेश पोखरियाल निशंकांसह चौघांना मंत्रिमंडळातून वगळले

googlenewsNext

Modi Cabinet Expansion: मोदी कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला आहे. कोरोनानंतर त्यांची प्रकृती ठीक नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. (Education minister Ramesh Pokhariyal dropped from Cabinet; ahead of Cabinet Reshuffle. )

रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. तर दुसरे मंत्री पश्चिम बंगालमधील खासदार देबोश्री चौधरी यांच्याकडे देखील राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांच्या जागी पश्चिम बंगालच्याच नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 
या दोघांनंतर केंद्रीय मंत्री सदानंद गौड़ा यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकमधील राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर राज्य मंत्री संतोष गंगवार यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. 

काल एका मंत्र्याला राज्यपालपद...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल (Governor) बनविण्यात आले आहे. 

सर्व नेते दिल्लीत
मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव,  दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच  लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे.  दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डाॅ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येउ शकते.

Read in English

Web Title: Narendra Modi Cabinet Reshuffle: Education minister Ramesh Pokhariyal dropped from Cabinet; debasree chaudhuri, sadanand gauda also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.