शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

Cabinet reshuffle: महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याला दिल्लीतून बोलावणे; मराठवाड्यात चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 10:39 AM

Narendra Modi Cabinet Reshuffle: राज्यातून नारायण राणे, कपिल पाटील, प्रीतम मुंडे किंवा भागवत कराड, पूनम महाजन, हिना गावित यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी हिना गावित यांना अद्याप दिल्लीवरून फोन आलेला नाही. तर भागवत कराड यांना आज फोन आला आहे. 

Modi Cabinet Expansion: मुंबई : मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार (Narendra Modi Cabinet expansion) आज सायंकाळी ६ वाजता केला जाणार आहे. मोदींनी आजची कॅबिनेट बैठक रद्द केली असून ज्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात येणार आहेत त्यांना दोन दिवसांपासून दिल्लीला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे राज्याचे हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) हे कालच सपत्नीक दिल्लीला गेले आहेत. राज्यातून दोन की चार नेत्यांना मंत्रिपद मिळणार याबाबत चर्चांना उधाण आलेले असताना बंजारा समाजाचे नेते आणि राज्यसभा खासदार भागवत कराड (Bhagvat karad) यांना देखील आज दिल्लीवरून बोलावणे आल्याचे सुत्रांनी सांगितले. (Bhagvat karad will get cabinet post in Modi Cabinet Expansion today.)

राज्यातून नारायण राणे, कपिल पाटील, प्रीतम मुंडे किंवा भागवत कराड, पूनम महाजन, हिना गावित यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी हिना गावित यांना अद्याप दिल्लीवरून फोन आलेला नाही. तर भागवत कराड यांना आज फोन आला आहे. भागवत कराड हे मराठवाड्यातील बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यांना गेल्या वर्षी राज्यसभेवर घेण्यात आले होते. पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर बंजारा समाजाचे नेते म्हणून भागवत कराड यांचे नाव पुढे करण्यात आले होते. राज्यात सध्या मराठा आंदोलनाचा विषय तापलेला आहे. यामुळे नारायण राणे आणि बंजारा समाजाचे नेते भागवत कराड यांच्या पारड्यात मंत्रिपद देवून जातीची समीकरणे बांधली जाण्याची शक्यता आहे. भागवत कराड यांना बोलावणे आल्याने प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे. 

सर्व नेते दिल्लीतळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव,  दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच  लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे.  दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डाॅ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येउ शकते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Pritam Mundeप्रीतम मुंडे