मुंबई - सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधित असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का, असा संतप्त प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.नरेंद्र मोदी यांची प्रिय व्यक्ती राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीच्या चौकशीवर आणखी प्रश्नांचा भडीमार करत सावंत पुढे विचारतात की, भाजपाचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करु देणार नाही. एका ५९ ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत असताना याचवेळी कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला १२०० किलो गांजासह अटक करण्यात आली याकडे त्यांनी ढुंकुंनही पाहिले नाही. कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदी हीला सँडलवूड ड्रग रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपाची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. अल्वा हा गुजरात भाजपाचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे आणि विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीपसिंहबरोबर सहनिर्माता आहे आणि मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. विवेक हा संदीपसिंहच्या निर्मिती कंपनीत भागीदार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्याश्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी