शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा चिपी विमानतळाच्या श्रेयवादाचा रंगणार ‘सामना’, राऊतांपाठोपाठ नारायण राणेंनी घेतली हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 12:28 IST

Chipi Airport: बहुप्रतिक्षित चिपी विमानतळासंदर्भात खासदार विनायक राऊत यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा श्रेयवादाचा ‘सामना’ रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

- सुहास शेलार मुंबई : बहुप्रतिक्षित चिपी विमानतळासंदर्भात खासदार विनायक राऊत यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा श्रेयवादाचा ‘सामना’ रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हे विमानतळ बांधून तयार असून, नागरी उड्डाण संचालनालयाची (डीजीसीए) परवानगी मिळाल्यानंतरच प्रवासी विमान वाहतुकीचा शुभारंभ करता येणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन व्हावे, यासाठी विनायक राऊत आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही केले, परंतु प्रत्येकवेळी उद्घाटनाची तारीख लांबल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. आधी कोरोनामुळे अडथळे आले आणि नंतर डीजीसीएच्या पथकाने धावपट्टीबाबत आक्षेप घेतल्याने सिंधुदुर्गातून विमान उड्डाणास विलंब झाला. आता डीजीसीएच्या निकषांनुसार धावपट्टीचे काम पूर्ण केल्यानंतर आयआरबी कंपनीने २८ जून २०२१ रोजी परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, अद्याप केंद्रीय पथकाने पाहणी न केल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत विनायक राऊत यांनी नुकतीच नवनिर्वाचित हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांनी पुढील आठ दिवसात ‘रिझल्ट’ देतो, असे आश्वासन राऊतांना दिले. पण, १० दिवस उलटले तरी डीजीसीएचे पथक सिंधुदुर्गात फिरकले नाही. आता नारायण राणे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

मंगळवारी राणे यांनी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चिपी विमानतळाच्या मंजुरीबाबत चर्चा केली. ‘परवानगीचे सोपस्कार तातडीने पूर्ण करून येत्या महिनाभरात विमानतळाचे उद्घाटन करू. मी स्वतः उद्घाटनाला उपस्थित राहीन’, अशी ग्वाही शिंदे यांनी त्यांना दिली. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची ही संधी भाजप हातातून जाऊ देणार नाही. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, यासाठी राणे प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना