मोठी बातमी! नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 07:12 PM2021-06-14T19:12:55+5:302021-06-14T19:13:42+5:30

Narayan Rane: भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.

Narayan Rane leaves for Delhi hoping to get a place in pm narendra Modi cabinet | मोठी बातमी! नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा

मोठी बातमी! नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा

Next

Narayan Rane: भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली घडत असताना नारायण राणेंची दिल्लीवारी महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

नारायण राणे हे दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. नारायण राणे हे एका महिन्यापूर्वी दिल्लीला जाऊन आले होते. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी त्यांना ठाम खात्री असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते स्वत:हून दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल  असा ठाम विश्वास राणेंना असल्याचं सांगितलं जात आहे. 

नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकणात आले होते. त्यावेळी अमित शाह यांनी नारायण राणेंच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. तसंच त्यांनी कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळवून दिलेल्या यशाचं बक्षीस त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून दिलं जाण्याची चर्चा रंगली आहे. 

Web Title: Narayan Rane leaves for Delhi hoping to get a place in pm narendra Modi cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app