शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 3:45 PM

राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणारमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची माहितीटिळक भवन नुतनीकरणाचा शुभारंभ व पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार

मुंबई: खासदार राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. (nana patole says we will celebrate rahul gandhi birthday as sankalp diwas)

यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुलजींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन राहुलजींचा वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.  

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत तर पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत. युवक काँग्रेस/एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील. देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे, असेही पटोले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आरजी किटचे वाटप...

खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेसच्यावतीने गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असलेल्या ‘आरजी किट’ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे. आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.आरजी किट वाटपाचा हा कार्यक्रम एनएसयुआयचे संदीप पांडे यांनी आयोजित केला होता.

टिळक भवन नुतनीकरणाचा शुभारंभ व पक्ष प्रवेश कार्यक्रम

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश काँग्रेसचे दादर येथील नूतनीकरण केलेल्या टिळक भवन या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते व मंत्री उपस्थित राहणार आहेत. यानंतर  पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे. माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनिल देशमुख हे आपल्या सहका-यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस