ठळक मुद्देजयंत पाटील यांनी केला 'त्या' विधानाबाबतचा खुलासाप्रसारमाध्यमांकडून चुकीच्या पद्धतीनं विधान चालवलं जात असल्याचं पाटील म्हणालेमुख्यमंत्रिपदाबाबतच्या विधानावर अखेर जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण
मुख्यमंत्रिपदाबाबतच्या इच्छेबाबतच्या राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विधानावरुन सद्या जोरदार चर्चा सुरु असतानाच खुद्द जयंत पाटील यांनीच याबाबतचा सविस्तर खुलासा केला आहे.
"मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे. माझं व्हर्जन जे आहे ते लोकमतमध्ये व्यवस्थित देण्यात आलं आहे. ते मी ट्विटही केलं आहे", असं जयंत पाटील म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्रिपदाची इच्छा असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत केल्याचं वृत्त आज सकाळपासून माध्यमांमध्ये सुरू होतं. भाजप नेत्यांकडूनही जयंत पाटील यांच्या विधानावर टीका करण्यात आली. भाजप नेते अतुल भातळखकर यांनी 'आता महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत', असा टोला लगावला होता. आता खुद्द जयंत पाटील यांनी अशाप्रकारचं कोणताही विधान केलं नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी एक ट्विटही केलं आहे.
"इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमतमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती", असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं. ट्विटसोबतच पाटील यांनी 'लोकमत'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटोही ट्विट केला आहे.
जयंत पाटील मुलाखतीत नेमकं काय म्हणाले?
इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जयंत पाटील यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हावसं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. "आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रिपद आलेलंच नाही", असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर मुलाखतकारानं पण तुमची इच्छा आहे का? असं जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर पाटील म्हणाले, "माझी इच्छा असणारच ना...प्रत्येक राजकारणाऱ्याला मुख्यमंत्री व्हावसं वाटणारच. पण पक्ष जो निर्णय घेईल. शरद पवार जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा सगळ्यांनाच असते. मला वाटतं की इतक्या दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रत्येकाला किंवा माझ्यापेक्षा मतदारांनाही इच्छा असू शकते. परंतु परिस्थिती, सध्याची संख्या पाहता आमचे ५४ आमदार आहेत. त्यात मला वाटत नाही शक्य होईल. आमचा पक्ष वाढला पाहिजे", असं जयंत पाटील म्हणाले.
Web Title: my statement was distorted the real news was published by Lokmat says Jayant Patil
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.