'मेरा परिवार भाजप परिवार' भारतीय संस्कृतीच्या विरोधात : काँग्रेसचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 16:48 IST2019-02-14T16:42:02+5:302019-02-14T16:48:22+5:30

भारतीय संस्कृतीत एखाद्याला मदत केली तर आपण त्याचा गाजावाजा करत नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने लाभार्थींना असे कृत्य करण्यास भाग पाडले आहे.

'My family BJP family' campaign is against to Indian culture: Congress allegations | 'मेरा परिवार भाजप परिवार' भारतीय संस्कृतीच्या विरोधात : काँग्रेसचा आरोप  

'मेरा परिवार भाजप परिवार' भारतीय संस्कृतीच्या विरोधात : काँग्रेसचा आरोप  

पुणे : भाजपने सुरु केलेले मेरा परिवार भाजप परिवार हे अभियान भारतीय संस्कृतीच्या विरोधात असून त्याचा तीव्र निषेध पुणे शहर काँग्रेसने केला आहे. 

                 सध्या भाजपतर्फे देशभरातील मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे घरावर भाजपचे झेंडे लावून मेरा परिवार भाजप परिवार नावाने अभियान सुरु आहे. अर्थात पुणे शहरात फिरतानाही अनेक घरांवर भाजपचे झेंडे फडकताना दिसत आहेत. त्यावर शहर काँग्रेसने निषेधाचे पत्रक काढले आहे. 

                त्यात म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीत एखाद्याला मदत केली तर आपण त्याचा गाजावाजा करत नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने लाभार्थींना असे कृत्य करण्यास भाग पाडले आहे. शिवाय योजना राबवायला लागणारा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वैयक्तिक स्वरूपात वापरला नाही. यासाठी कर भरणाऱ्या जनतेचे पैसे वापरले गेले आहेत. त्यामुळे पराभवाच्या भीतीपोटी भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याने लाभार्थींवर उपकार केल्यासारखे हे झेंडे, आकाशकंदील लावण्याची सक्ती सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Web Title: 'My family BJP family' campaign is against to Indian culture: Congress allegations