Mumbai bank scam case : problems will increase of BJP leader Praveen Darekar, orders of Detailed audit | भाजपा नेते प्रवीण दरेकरांसमोरील अडचणी वाढणार, त्या प्रकरणात अधिक चौकशी होणार

भाजपा नेते प्रवीण दरेकरांसमोरील अडचणी वाढणार, त्या प्रकरणात अधिक चौकशी होणार


मुंबई - धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप, राज्यातील वाढता कोरोना आणि वीजबिलांचा प्रश्न यावरून राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजपा (BJP) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कमालीचा आक्रमक झाला आहे. भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राठोड यांच्यासह विविध प्रकरणांवरून राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. (Mumbai bank scam case) मात्र आता मुंबै बँकेतील घोटाळ्याच्या प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (problems will increase of BJP leader Praveen Darekar, orders of Detailed audit in Mumbai bank scam case )

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू होती. दरम्यान, या बँकेच्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. त्यानंतर या प्रकरणी सविस्तर ऑडीट करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यासमोरील अडचणीत वाढ होऊ शकते. 

मुंबै बँकेच्या कारभारावर नाबार्डच्या २०१८-१९ च्या अहवालातूनही गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. हल्लीच हा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर या प्रकरणी सहकार विभागाने सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतींवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना २०१६ मध्ये लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Mumbai bank scam case : problems will increase of BJP leader Praveen Darekar, orders of Detailed audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.