शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

MPSC Exam Postponed: “अधिवेशन, लग्न समारंभ होतात मग MPSC परीक्षा का नाही?”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 16:52 IST

Congress Leader Prithviraj Chavan Oppose Thackeray government decision of MPSC Exam Postponed: MPSC परीक्षेबाबत अनिश्चितता योग्य नाही, कोरोना काळात लग्न समारंभ, अधिवेशन पार पडतात मग एकट्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणे योग्य नाही

ठळक मुद्दे विद्यार्थींनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा? ते भावी प्रशासकीय अधिकारी आहेतराज्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाकोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे?

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, परंतु आता या निर्णयावरून काँग्रेस नेत्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. अधिवेशन, लग्न समारंभ, आरोग्य विभागाच्या भरती होतात मग MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण(Congress Prithviraj Chavan) यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे MPSC परीक्षांचा निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेण्यात आलं होतं की नव्हतं असा प्रश्न उपस्थित होतो.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, MPSC परीक्षेबाबत अनिश्चितता योग्य नाही, कोरोना काळात लग्न समारंभ, अधिवेशन पार पडतात मग एकट्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणे योग्य नाही, विद्यार्थींनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा? ते भावी प्रशासकीय अधिकारी आहेत, कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घ्यायला हव्यात असं त्यांनी सांगितले, टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय अन् सरकारमध्ये मतभेद

MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होत्या, परंतु राज्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हजारो विद्यार्थी संतप्त झाले, त्यांनी पुण्यातील रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा विरोध केला, काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.

पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट करून म्हटलंय की, एमपीएससीची परीक्षा(MPSC Exam) अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे असं त्यांनी सांगितले आहे.

सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल

सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा प्रश्न भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे, तसेच जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोवर रस्त्यावरून बाजूला हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण