शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप मुख्यालयात खासदाराने चौकीदाराकडे दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 03:28 IST

लोकसभेसाठी पुन्हा तिकीट न मिळाल्याचा पक्षश्रेष्ठींवरील राग चौकीदाराकडे राजीनामा देऊन व्यक्त

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपचे मछलीशहरचे (उत्तर प्रदेश) खासदार रामचरित्र निषाद यांनी त्यांना लोकसभेसाठी पुन्हा तिकीट न मिळाल्याचा पक्षश्रेष्ठींवरील राग मंगळवारी येथील पक्ष मुख्यालयात जात चौकीदाराकडे राजीनामा देऊन व्यक्त केला.राजीनामा देताना ते म्हणाले की, माझे तिकीट कापले गेले याबद्दल मला काही म्हणायचे नाही. दु:ख याचे आहे की, जी व्यक्ती पाच वर्षांपूर्वी आमच्याकडून पावणे दोन लाख मतांनी पराभूत झाली तिला उमेदवारी दिली गेली याचे. जर स्थानिक नेता किंवा पदाधिकाऱ्याला तिकीट दिले गेले असते तर काही तक्रार नव्हती. परंतु, ज्याने पक्षासाठी गेल्या पाच वर्षांत काहीही काम केले नाही त्याला संधी दिली गेली.आपापसात भांडून एकमेकांना संपवण्याचा जो खेळ सुरू आहे त्यात भाजपचे उत्तर प्रदेशमध्ये मोठे नुकसान होत आहे. पोट निवडणुकीत हेच झाले. या वातावरणात भाजप ७४ जागा जिंकण्याचे स्वप्न बघत आहे. असा चमत्कार समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष युतीबाबत घडू शकतो, असे निषाद म्हणाले.निषाद यांना सप-बसप-रालोद आघाडीने मिर्झापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. येथे त्यांच्या स्पर्धक आहेत भाजपचा मित्रपक्ष अपना दलच्या अनुप्रिया पटेल. भाजपने रामचरित्र निषाद यांचे तिकीट कापून नुकतेच बसपतून भाजपत आलेले बी. पी. सरोज यांना मछली शहर मतदारसंघातून तिकीट दिले. गेल्या निवडणुकीत निषाद यांनी सरोज यांना जवळपास १.७५ लाख मतांनी पराभूत केले होते. निषाद पक्षाचे प्रमुख संजय निषाद यांचा मुलगा प्रवीण निषाद भाजपमध्ये येणे महायुतीस झटका मानला जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाMember of parliamentखासदारUttar Pradeshउत्तर प्रदेश