‘सीमोल्लंघना’चा मुहूर्त हुकणार! एकनाथ खडसेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 02:13 AM2020-10-17T02:13:07+5:302020-10-17T02:14:45+5:30

Eknath Khadse News: घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना खडसे यांनीच त्याचे खंडन केले

The moment of 'Simollanghana' will be missed! What exactly is hidden in Eknath Khadse's mind? | ‘सीमोल्लंघना’चा मुहूर्त हुकणार! एकनाथ खडसेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय?

‘सीमोल्लंघना’चा मुहूर्त हुकणार! एकनाथ खडसेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय?

Next

जळगाव/पुणे : भाजप नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून ते शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पक्षांतराबाबत ‘नो कॉमेंट’ असे उत्तर दिल्याने त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना खडसे यांनीच त्याचे खंडन केल्याने व रावेर तालुक्यातील घटनेवरून सरकारवर टीका केल्याने त्यांचा राष्ट्रवादी बारगळला की विजयादशमीचा मुहूर्त ते साधणार? अशी चर्चा रंगली आहे. खडसे म्हणाले, या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरविले आहेत,असे खडसे म्हणाले. शिवाय, त्यांनी सरकारवर टीकाही केली.

खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती नाही - अजित पवार
राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेश बद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे दिली.

Web Title: The moment of 'Simollanghana' will be missed! What exactly is hidden in Eknath Khadse's mind?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.