शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

...ही तर मोदींची मानसिक हार; पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचं शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 1:29 PM

मोदींच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंची सडकून टीका

मुंबई: पत्रकार परिषद घेऊन एकाही प्रश्नाला उत्तर न देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शरसंधान साधलं. मोदींनी एकाही प्रश्नाला उत्तर न देणं ही त्यांची मानसिक हार असल्याची टीका राज यांनी केली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नव्हती, मग मोदी पत्रकार परिषदेला कशासाठी आले, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. पत्रकारांशी संवाद साधताना मनसे प्रमुखांनी मोदींचा समाचार घेतला. पाच वर्षे सत्तेत असूनही मोदी त्यांनी दिलेल्या आश्वासनांबद्दल अवाक्षर काढत नाहीत. मोदी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र तिथे मोदी काहीच बोलत नाहीत. हीच मोदींची मानसिक हार आहे. यापुढची हार 23 मे रोजी होईलच, अशा शब्दांत राज यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं. पंतप्रधान मोदी पत्रकारांना इतके का घाबरतात, त्यांनी असं काय केलं आहे की त्यामुळे त्यांना पत्रकारांची इतकी भीती वाटते, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. पंतप्रधानांची कालची पत्रकार परिषद ही मौन की बात होती, असा टोलादेखील त्यांनी लगावला. काल पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान म्हणून मोदींची ही पाच वर्षातील पहिलीच पत्रकार परिषद होती. मात्र यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी दिली. पत्रकारांनी थेट विचारलेले काही प्रश्न पंतप्रधानांनी मोठ्या खुबीनं शहांकडे टोलवले. 'मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,' असं मोदी म्हणाले. यानंतरही एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरं देण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत शहांनी त्या प्रश्नाचं उत्तरदेखील स्वत:च दिलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRaj Thackerayराज ठाकरेAmit Shahअमित शहाBJPभाजपाMNSमनसे