शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena Vs MNS: फरक विचारांचा...! शिवसेना आमदारांच्या दारूवाटपावर मनसेचे 'मीम वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 17:24 IST

Shivsena liquor: सोशल मीडियावर तुफान टोलेबाजी. शिवसेनेचे वागळे इस्टेट विभागाचे नगरसेवक दीपक वेतकर यांनी आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी दारू वाटप केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शिवसेना नगरसेवकाने ठाण्यात केलेल्या दारू वाटपावरून प्रचंड टीकेची झोड सोशल मिडीयावर उठली होती. हाच धागा पकडत नेटकऱ्यांनी विविध मीम बनवून शिवसेनेच्या दारू वाटपाला टार्गेट केले आहे. मनसेने तर 'शिवसेनेचे दारू वाटप आणि मनसेचे आमरस पुरी वाटप' अशा टॅगलाइनचे बॅनर सर्वत्र व्हायरल केल्याने शिवसैनिकांची पुरती गोची झाली आहे. (MNS attacks on Shivsena over liquor distribution in MLa office.)

शिवसेनेचे वागळे इस्टेट विभागाचे नगरसेवक दीपक वेतकर यांनी आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी दारू वाटप केले होते. कार्यकर्त्यांना मद्य देतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी एका समाजसेवकांनी ठाणे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारही केली होती. हे वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या कृतीबाबत सर्वच राजकीय पक्षांनी तोंडसुख घेतले.

सध्याच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात प्रत्येक विषयाचे मीम व्हायरल केले जातात. त्यानुसार मनसेने शिवसेनेच्या दारू वाटप कार्यक्रमाचे फोटो वापरून त्या शेजारीच नुकत्याच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आमरस पुरि वाटपाच्या कार्यक्रमाचे लावले. 'फरक विचारांचा, वारसा संस्कारांचा' ही टॅगलाइन वापरून शिवसेनेला चिमटे काढण्याची संधीही मनसेने सोडली नाही. 

केंद्राच्या मदतीवरूनही शालजोडीसतत केंद्राकडे बोट दाखवणार्या शिवसेनेला चिमटे काढण्याची एकही संधी मनसेच्या नेटकऱ्यांनी सोडली नसून आम्ही खंबा दिला, केंद्राने चकणा द्यावा, असे शालजोडीतले मिम सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेMLAआमदार