शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

“२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का?"; मनसेचा टीकेचा बाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 13:50 IST

स्थानिक परिसराच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आमदार निधी. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?, मनसेचा सवाल.

ठळक मुद्देस्थानिक परिसराच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आमदार निधी.चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?, मनसेचा सवाल.

आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आमदार निधीचा वापर केला आहे. स्थानिक विकास निधी योजनेतंर्गत ही रक्कम मुख्यमंत्र्यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. २२ एकरात पसरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे आणि शिवसेनेचे ऐतिहासिक नातं आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदार निधीतून पैसे दिल्यानंतर महापालिकेने आता याकामासाठी निविदा मागवली आहे. त्यामध्ये विद्युत दिवे, पथदिवे, रोषणाई, पुतळ्यावरील स्पॉट लाईट्स आणि इतर शुशोभिकरणाची कामं केली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.

 “२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? दुसऱ्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प चोरला आहे. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?,” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे.  मनसेवर कुरघोडीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर शिवसेनेचा दादर आणि शिवाजी पार्क परिसरातील प्रभाव थोडा कमी झाला होता. याठिकाणी २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे सर्व नगरसेवक निवडून आले होते. दादर येथील शिवसेनेचा पराभव खुद्द बाळासाहेब ठाकरेंच्याही जिव्हारी लागला होता. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने इथं पुन्हा कमबॅक केले. परंतु दादर आणि शिवाजी पार्क परिसरात मनसेचेही वर्चस्व कायम आहे. स्थानिक आमदार, नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील शुशोभिकरणाच्या निमित्तानं शिवसेनेने या भागात त्यांचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईRaj Thackerayराज ठाकरे