शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Raj Thackeray: विनंती मान्य केलीत त्याबद्दल आभार; राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना धन्यवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 10:27 AM

mns chief raj thackeray thanks pm narendra modi: राज ठाकरेंनी ट्विट करून मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एका बाजूला लसीकरणानं वेग धरला असताना दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिमेस काही ठिकाणी ब्रेक लागला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हाफकिनसारख्या संस्थांना लस उत्पादनाची परवानगी देण्याची मागणी केली होती. या मागणीला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्याबद्दल राज यांनी मोदींचे आभार मानले आहेत.‘शंभर टक्के लसीकरणासाठी महाराष्ट्राला मोकळीक द्या’महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याची मागणी राज ठाकरेंनी पत्र लिहून पंतप्रधान मोदींकडे केली होती. काल रात्री यासंदर्भात मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे आता हाफकिनला कोरोनावरील लस उत्पादन करता येईल. राज्यातील कोरोना लसीचा तुटवडा निर्माण होण्यास त्यामुळे मोठी मदत होईल.  मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल राज ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. '१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की,' असं राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला मेन्शनदेखील केलं आहे.राज्यात कडक निर्बंध लागण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं पत्रात?वारंवार निर्बंध किंवा टाळेबंदी लावणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. पण, राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उपस्थित केला होता. तसेच शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणीही राज यांनी केली होती.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून लसींसंदर्भात मागण्या केल्या होत्या. महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या, राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात; ‘सिरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून हाफकिन, हिंदुस्तान अँटिबायोटिक आदी संस्थांना लस उत्पादनाची मुभा द्यावी आणि कोरोनावरील उपचारांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर, ऑक्सिजन अशा औषधांचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी राज यांनी मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.कोरोना साथीचे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. या साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तेथील परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. ‘आरोग्य’ हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यास प्रोत्साहन द्यावे. यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस