शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये मनसे आनंद परांजपेंच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:04 IST

ठाणे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना मीरा-भाईंदरमध्ये साथ देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.

मीरा रोड : ठाणे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना मीरा-भाईंदरमध्ये साथ देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. परांजपे हे सुशिक्षित उमेदवार असल्याने ही भूमिका घेतल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. बुधवारी रात्री मीरा रोड येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला. याशिवाय, मनसेने मोदी व भाजपविरोधात चौकसभा घेण्यासही सुरुवात केली आहे.मीरा रोडच्या मनसे शहर कार्यालयातील सभागृहात बुधवारी रात्री पदाधिकाºयांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास आनंद परांजपे यांच्यासह ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मोदी-शहामुक्त भारताची हाक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देत राज्यभर विरोधाच्या सभा चालवल्या आहेत. कुठल्याही स्थितीत पुन्हा भाजप सत्तेवर येता कामा नये, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतल्याचे जाधव यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँगे्र्रस आघाडीला म्हणून नव्हे, तर आनंद परांजपे हे एक सुशिक्षित, चांगले, अनुभवी कार्यकर्ते असल्याने त्यांना मनसे साथ देणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.परांजपे यांनी विद्यमान खासदार राजन विचारे निष्क्रिय ठरले असून त्यांनी शहराचे प्रश्न सोडवले नसल्याचा आरोप केला. २७ एप्रिल रोजी परांजपे यांच्या प्रचारफेरीत मनसे सोबत असेल, असे शहराध्यक्ष सुर्वे म्हणाले. दुसरीकडे शहरात चौकसभा घेऊन मनसेने मोदी सरकारविरोधात टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. मीरा रोड स्थानकाबाहेर मोदींना सवाल करणारे फलक घेऊन मनसेने निदर्शने केली.नोटाबंदी व जीएसटीमुळे उदध्वस्त उद्योग व रोजगार, वाढता भ्रष्टाचार, वाढते गॅस-पेट्रोल-डिझेलचे दर आदी मुद्यांवरून चौकसभांत मोदी आणि भाजपविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. भार्इंदर, मीरा रोड, काशिमीरा आदी ठिकाणी चौकसभा, प्रचारफेºया काढण्यात येणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस