Marathi cinema will be made Uttar Pradesh film City; Challenge to Uddhav Thackeray | उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार; उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान

उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार; उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान

लखनऊ : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि कंगना वादावरून मुंबईतून बॉलिवूड दुसरीकडे नेण्याचे आव्हान देण्यात आले होते. यावर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. 


उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी एक मुलाखत दिली. उद्धव ठाकरेंनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फिल्म सिटी तिकडे नेऊन दाखवा, असे आव्हान दिले आहे. यावर त्यांनी हे भाष्य केले आहे. फिल्मसिटी किंवा बॉलिवूड ही काही वस्तू नाही जे कोणी एकडचे तिकडे उचलून नेईल.उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य आव्हान कमी आणि राजकारण जास्त वाटते. कदाचित त्यांना योगी आदित्यनाथांची काम करण्याची पद्धत माहिती नाहीय. त्यांनी एकदा मनावर घेतले तर ते पूर्ण करूनच सोडतात. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीसाठी ग्रेटर नोएडामध्ये जागा घेण्यात आली आहे. इतर कामे सुरु झाली आहेत. लवकरच इथे फिल्मसिटी उभारलेली दिसेल, असे श्रीवास्तव म्हणाले. 


आम्ही कोणाच्या तुलनेच आमची फिल्मसिटी उभारणार नाही. तर चांगली फिल्मसिटी बनविणार आहोत. यामुळे लोकांना रोजगार मिळेल. आम्ही एवढ्या चांगल्या सुविधा देऊ की हिंदीच नाही तर मराठी सिनेमेदेखील इथेच बनविले जातील. तसेच इंग्रजीही, असे ते म्हणाले. 


मुंबई आणि उत्तर प्रदेशच्या सिनेमांमध्ये काय फरक आहे, असे विचारले असता त्यांनी युपी, बिहारचे अभिनेते, अभिनेत्री तिकडे जाऊन त्यांच्यातील दम दाखवितात. अनेक मोठी नावे आमच्या इथलीच आहेत. युपीमध्ये आता सबसिडी मिळू लागली आहे. यामुळे मुंबईच्या तुलनेच सिनेमे बनविण्याचा खर्चही कमी होणार आहे. इतर कामेही झटपट होतात. प्रत्येक जिल्ह्यात आता सिंगल विंडो सिस्टीम सुरु करण्यात आली आहे. यामुळे निर्मात्यांना वेळेत सरकारी कामे आटोपता येणार आहेत, असे सांगितले. 


वेबसिरीजमध्ये शिवीगाळ आणि अश्लिलला भरलेली असते. आम्ही अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देऊ शकत नाही. वेबसिरीजला चांगला कंटेंट मिळत नाहीय, ही मोठी समस्या आहे. सध्यातरी वेबसिरिजसाठी नाही कोणती सेन्सरशिप आहे नाही गाईडलाईन, यामुळे त्यांना जे दाखवायचे आहे ते कोणताही मुलाहिजा न ठेवता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविले जाते. त्यांनी कंटेंट सुधारला तर त्यांनाही सबसिडी देण्याचा विचार होईल असे श्रीवास्तव म्हणाले.

Web Title: Marathi cinema will be made Uttar Pradesh film City; Challenge to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.