शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Maratha Reservation: “मुख्यमंत्री साहेब, तुमच्या आदित्य किंवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 14:47 IST

BJP NItesh Rane Reaction on Maratha Reservation verdict in Supreme Court: फक्त नाटक आणि ढोंगीपणा. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा असा इशाराही नितेश राणेंनी सरकारला दिला आहे.

ठळक मुद्देसरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. कसली तयारी नाही महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहेभाजपा आमदार नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

मुंबई – मराठा समाजासाठी दिलेल्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. या निर्णयावर सर्वच स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला टार्गेट केलं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्या आदित्य किंवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते तर..अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.(BJP MLA Nitesh Rane Target CM Uddhav Thackeray over Maratha Reservation Supreme court verdict)

आमदार नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या आदित्य किंवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते. त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते तर मग मराठा आरक्षण नक्कीच टिकवले असते असं त्यांनी म्हटलं आहे.

त्याचसोबत या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. कसली तयारी नाही. फक्त नाटक आणि ढोंगीपणा. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा असा इशाराही नितेश राणेंनी सरकारला दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची  लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. महाराष्ट्राने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विधी मंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला. काय तर म्हणे, महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला.

त्याचसोबत आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याआाधी शहाबानो प्रकरण, ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात तसेच ३७० कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेवून न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा