शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

Maratha Reservation: “शिवरायांच्या राजधानीत सच्चा मावळा असं कृत्य करणार नाही; NCP कार्यालयावर दगडफेक करणारे...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:05 IST

छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्च्या मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.

ठळक मुद्दे बहुजन व मराठा समाजाबद्दल आकस असल्याने त्यांनी अनेक मराठा समाजातील नेतृत्व आपल्या बाजूला ओढून घेतले आहेलॉकडाऊनचे निर्णय पटकन घेतले जातात मग मराठा आरक्षण निर्णय सुध्दा ते घेऊ शकत होते. पण, त्यांनी ते केले नाही सर्व पुरोगामी विचारांचे समाज बांधव व इतर समाज यांच्या सहकार्याने एक ना एक दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवू

सातारा - सर्वोच्च न्यायालयाने  मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत घेतलेला निर्णय हा दुर्दैवी घटना आहे. परंतु, या पाठीमागे मोठे षडयंत्र सामान्य माणसाला दिसून येत आहे. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी  कार्यालयावर ज्यांनी सूडबुद्धीने दगडफेक केली. तो कोणत्या पक्षाशी व 'संघा'शी संलग्न आहेत, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.(MLA Shashikant Shinde Target BJP Over Broken up NCP Office in Satara by unidentified people)          

याबाबत शशिकांत शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्च्या मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींचे कोणाकोणाशी संबंध आले? हा कट कुठे शिजला? याची पाळेमुळे पोलीस यंत्रणेने शोधली पाहिजेत. अशा हल्ला मराठा समाज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. म्हणून पोलीस यंत्रणेला अगोदर आम्ही जाब विचारण्यासाठी पोहचलो आहे. आपल्याला खूप मोठी शाबासकी मिळेल या भ्रमात संबंधितांनी राहू नये. आम्ही जशास तसे उत्तम प्रकारे उत्तर देऊ शकतो असा ही मार्मिक इशारा त्यांनी दिला आहे.  

मराठा आंदोलन चिघळलं; साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं, अन्...

तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेतील, त्याबाबत राज्य सरकारला श्रेय किंवा दोष देता येणार नाही. असा आशय मांडला होता. सध्या आरक्षण निकालाने त्याची भूमिका ही मराठा समाजामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणारी प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बहुजन व मराठा समाजाबद्दल आकस असल्याने त्यांनी अनेक मराठा समाजातील नेतृत्व आपल्या बाजूला ओढून घेतले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे माजी मुख्यमंत्री उभे राहिले. अनेकांच्या राजकीय महत्वकांक्षा कमी करण्यासाठी कधी इडी, सी.बी. आय, गुतचर विभाग, फोन टापिंग चे प्रकार मागे लावले, तरी तेवढी ताकद मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे लावली नाही,३७० कलम रद्द करणे, तलाक पद्धत रद्द करणे, नोटबंदी, लॉकडाऊनचे निर्णय पटकन घेतले जातात मग मराठा आरक्षण निर्णय सुध्दा ते घेऊ शकत होते. पण, त्यांनी ते केले नाही, ते झाले असते तर केंद्राने केले असे सांगून नेहमीप्रमाणे दिशाभूल केली असती असा ही आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान, मोडेन पण वाकणार नाही, ही जात मराठ्यांची आहे, सर्व पुरोगामी विचारांचे समाज बांधव व इतर समाज यांच्या सहकार्याने एक ना एक दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवू असा ही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSatara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShashikant Shindeशशिकांत शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस