शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर केलं मोठं विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 11:14 IST

Maratha Reservation News: Sambhaji Raje met Sharad Pawar, made a big statement after the meeting : मराठा आरक्षण रद्द झाल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौरा केल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द ठरवल्यापासून महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौरा केल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Shaad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी मोठे विधान केले आहे. (Maratha reservation issue MP Sambhaji Raje met Sharad Pawar)

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. गेल्या काही दिवसांत मी राज्यात फिरून मी मराठा समाजाच्या भावना जाणून घेतल्या होत्या. या भेटीवेळी मी राज्यातील मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे हे शरद पवार यांना सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांना सांगितले. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यासह सर्वच नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. 

दरम्यान, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने समाजासाठी काय करता येईल यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, असे काल संभाजीराजे म्हणाले होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण