शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

भाजपाचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा

By बाळकृष्ण परब | Published: January 21, 2021 3:40 PM

Maharashtra Politics News : गेल्या काही दिवसांपासून पक्षाला लागलेली गळती ही भाजपासाठी चिंतेची बाब ठरलेली आहे. आता भाजपाची चिंता वाढवणारा अजून एक दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्यातील भाजपाचे अनेक बडे नेते हे राष्ट्रवादीच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला दावाराष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या भाजपाचे बडे नेते कोण याची सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे चर्चा

मुंबई - नुकत्याचा आटोपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या एकत्रित बेरजेसमोर भाजपाची आकडेवारी फारच किरकोळ ठरली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पक्षाला लागलेली गळती ही भाजपासाठी चिंतेची बाब ठरलेली आहे. आता भाजपाची चिंता वाढवणारा अजून एक दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.राज्यातील भाजपाचे अनेक बडे नेते हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता असून, त्याचे हादरे भाजपाला बसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या भाजपाचे बडे नेते कोण याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता विविध पक्षाचे नेते पुन्हा घरवापसी  करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत, त्यामुळे आगामी काळात मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर पुन्हा वाजणार असल्याचं दिसत आहे.मीरा-भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते यांच्यासह शेकडो नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काही कारणास्तव या नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून इतर पक्षात प्रवेश घेतला होता, परंतु आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीरा-भाईंदरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता.

 

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण