Mansukh Hiren: मनसेच्या 'त्या' आरोपावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 11:30 AM2021-03-06T11:30:10+5:302021-03-06T11:30:59+5:30

Mansukh Hiren Death Case: मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ट्विटवर भाष्य करणं राऊतांनी टाळलं; पत्रकारांच्या प्रश्नाला बगल

Mansukh Hiren Death case shiv sena mp Sanjay Raut refrained from speaking on sachin waze | Mansukh Hiren: मनसेच्या 'त्या' आरोपावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार?

Mansukh Hiren: मनसेच्या 'त्या' आरोपावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार?

Next

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह काल सापडला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव संशयाच्या भोवऱ्याता सापडलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सचिन वाझेंवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. (shiv sena mp Sanjay Raut avoids question related with sachin waze)

कोणी कोणी त्रास दिला?; मनसुख यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर

संदीप देशपांडे यांनी एका ट्विटमधून सचिन वाझेंचं शिवसेना कनेक्शन समोर आणत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलणं टाळलं. याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार नाही, इतकंच राऊत यांनी म्हटलं. मनसुख हिरेन प्रकरणी सत्य जितक्या लवकर बाहेर येईल, तितकं सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य असेल. निरपराध व्यक्तीच्या मृत्यूचं विरोधकांनी भांडवल करू नये, असं संजय राऊत म्हणाले.

सर्व महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडेच कशा? सचिन वाझे भाजपपाठोपाठ मनसेच्याही रडारवर

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार याबद्दलचं सत्य चौकशीतून समोर येईल. अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या कारचे मालक आणि या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू होणं अतिशय धक्कादायक आहे. या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या पथकात अनेक नावाजलेले अधिकारी आहेत. ते सत्य शोधून काढतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे विधानसभेत पडसाद; विरोधक आक्रमक

काय म्हणाले संदीप देशपांडे?
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. 'सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असे प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.

Read in English

Web Title: Mansukh Hiren Death case shiv sena mp Sanjay Raut refrained from speaking on sachin waze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.