Mamata Banerjee: मोदींना नकार, पण नितीन गडकरींना होकार; ममतांचे मुख्य सचिव उद्या दिल्लीला येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 06:50 PM2021-07-29T18:50:15+5:302021-07-29T18:50:49+5:30

Mamata Banerjee meets Union Transport Minister Nitin Gadkari: गडकरी यांच्या भेटीनंतर ममता यांनी सांगितले की, बंगालमध्ये इलेक्ट्रीक बस, ऑटो, स्कूटरचे उत्पादन केल्यास चांगले होईल. आपले राज्य बांग्लादेश, भूतान, नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यांना जोडलेले आहे. यामुळे आम्हाला तिथे चांगल्या रस्त्याची देखील गरज असल्याची विनंती केली. 

Mamata Banerjee politics: chief secretary will come Delhi After Nitin Gadkari call, rejected at Narendra modies call | Mamata Banerjee: मोदींना नकार, पण नितीन गडकरींना होकार; ममतांचे मुख्य सचिव उद्या दिल्लीला येणार

Mamata Banerjee: मोदींना नकार, पण नितीन गडकरींना होकार; ममतांचे मुख्य सचिव उद्या दिल्लीला येणार

Next

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यानंतर दुसऱ्य़ाच दिवशी त्यांच्याविरोधात 2024 चे रणशिंग फुंकले आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलावल्यावर त्यांना भेटायला गेल्या. आज ममता यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली आहे. यावेळी गडकरी यांनी म्हणताच ममतांनी मुख्य सचिवांना उद्या दिल्लीला येण्याचे फर्मान सोडले आहे. (West Bengal CM and TMC leader Mamata Banerjee meet Union Minister Nitin Gadkari in Delhi.)

बंगाल निवडणुकीनंतर उसळलेल्या दंगलीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिवांना दिल्लीला येण्याचे आदेश दिले होते. परंतू त्यांना पाठविण्यास ममता यांनी नकार दिला होता. यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस, राजीनामा आणि पुन्हा राज्य सरकारची नोकरी असा घटनाक्रम घडला होता. आज गडकरींनी म्हणताच ममता यांनी मुख्य सचिवांना उद्या दिल्लीला बोलावले आहे. 


गडकरी यांच्या भेटीनंतर ममता यांनी सांगितले की, बंगालमध्ये इलेक्ट्रीक बस, ऑटो, स्कूटरचे उत्पादन केल्यास चांगले होईल. आपले राज्य बांग्लादेश, भूतान, नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यांना जोडलेले आहे. यामुळे आम्हाला तिथे चांगल्या रस्त्याची देखील गरज असल्याची विनंती केली. 

ममता म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्य सचिवांना दिल्लीला पाठविण्यास सांगितले आहे. महासंचालक, पीड्ब्ल्यू मंत्री, सचिव, परिवाहन सचिव आणि मंत्री गडकरी स्वत: बैठक घेणार आहेत. यासाठी माझे मुख्य सचिव उद्या दिल्लीला येणार आहेत. गडकरींच्या सांगण्यावरून मी त्यांना पाठवत आहे.  (West Bengal Chief Minister Mamata Banerjee said that she discussed various infrastructural projects with Union Minister Nitin Gadkari.)
 

Web Title: Mamata Banerjee politics: chief secretary will come Delhi After Nitin Gadkari call, rejected at Narendra modies call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.