शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 20:25 IST

Maharashtra Assembly election Mahayuti Seat Sharing: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मकरंद पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. 

नितीन काळेल, साताराMaharashtra Election 2024: महायुतीतील भाजपनंतर शिंदेसेनेने मंगळवारी रात्री ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार पक्षाने सातारा जिल्ह्यातीलही दोन उमेदवार जाहीर करत अपेक्षेप्रमाणे पाटणला शंभूराज देसाई आणि कोरेगावमधून महेश शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने वाईतून मकरंद पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरी महायुतीचा विद्यमान आमदारांवरच विश्वास असल्याचे दिसून आले आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातही उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. पण, अजूनही महायुती तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपाचे सत्र सुरूच आहे. तरीही युतीतील भाजपने पहिली यादी तीन दिवसांपूर्वी जाहीर करून जिल्ह्यातील तीन उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे.

त्यानंतर मंगळवारी रात्री शिंदेसेनेने पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली आहे. पाटणमधून शंभूराज देसाई आणि कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे लढणार आहेत. तर महायुतीतील राष्ट्रवादीनेही बुधवारी दुपारी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यामध्ये वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

शंभूराज देसाईंविरोधात कोण?

जिल्ह्यातील उमेदवार जाहीर होत असतानाच आघाडीतून पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्याविरोधात कोण लढणार, हे महत्त्वाचे आहे. कारण, आघाडीत राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेलाही पाटण मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे वाटपात कोणाकडे मतदारसंघ राहणार, यावर लढत अवलंबून असेल. कोरेगावात आघाडीतील राष्ट्रवादीतून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे याठिकाणी मागीलप्रमाणेच आमदार महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यातच सामना होणार आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत नवे चेहरे नाही 

सातारा जिल्ह्यात शिंदेसेनेकडून अनेक जणांनी निवडणूक लढण्याची तयारी केली. पण त्यांना संधी मिळणारच नाही, हे स्पष्ट होत आहे. तसेच शिंदेसेनेला जिल्ह्यात दोनपेक्षा अधिक मतदारसंघ मिळणार नाहीत. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना निवडणूक लढविण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना