Maharashtra Vidhan Sabha: तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:49 IST2021-03-10T15:42:42+5:302021-03-10T15:49:26+5:30
Maharashtra Vidhan Sabha: विधानसभेत अनिल देशमुख आणि सुधीर मुनगंटीवारांमध्ये जुंपली; शेरोशायरीतून वार-पलटवार

Maharashtra Vidhan Sabha: तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्या
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विविध विषयांवर ठाकरे सरकारची कोंडी केली. अधिवेशनाला सुरुवात होताच मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर विविध विषयांवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस सरकारवर तुफान हल्लाबोल करत होते. त्यांना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी साथ दिली. वैधानिक विकास महामंडळावरुन ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी अडचणीत आणणाऱ्या मुनगंटीवार यांनी आज केलेल्या शायरीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सुधीर मुनगंटीवार अडचणीत; ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर
आज विधानसभेत विदर्भाच्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एकमेाकांवर शेरोशायरीच्या माध्यमातून हल्ला चढवला. देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ तुम्हाला बघून मला जगजीत सिंग यांची गझल आठवते. ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो, सुधीरभाऊ, तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो.’ देशमुख गझल ऐकवत असताना सुधीर मुनगंटीवार गालातल्या गालात हसत होते.
उद्धव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं- सुधीर मुनगंटीवार
यानंतर मुनगंटीवार यांनी शेर सादर करत देशमुखांना चोख प्रत्युत्तर दिलं. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा,’ असं मुनगंटीवार यांनी म्हणताच भाजपच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं. पण सुधीर मुनगंटीवार यांनी हा शेर सादर केल्यानंतर विधानसभेत एकच चर्चा रंगली. तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, असं मुनगंटीवार का म्हणाले? महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत का?, अशी उलटसुलट चर्चा विधानसभेत सुरू झाली.