शासनाची ४ खाती चालवणारे 'त्या’ बाहेरच्या व्यक्ती कोण?; भाजपा आमदाराचा सभागृहात गौप्यस्फोट

By प्रविण मरगळे | Published: March 3, 2021 06:35 PM2021-03-03T18:35:50+5:302021-03-03T18:40:27+5:30

Maharashtra Vidhan Sabha Budget Session: महाराष्ट्र सरकार हे आपले सरकार आहे असं प्रचार करते, पण शासनाची चार खाती मंत्री किंवा अधिकारी नाही पण वेगळीच माणसे चालवत आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Budget Session BJP MLA Ashish Shelar Criticized Thackeray Government | शासनाची ४ खाती चालवणारे 'त्या’ बाहेरच्या व्यक्ती कोण?; भाजपा आमदाराचा सभागृहात गौप्यस्फोट

शासनाची ४ खाती चालवणारे 'त्या’ बाहेरच्या व्यक्ती कोण?; भाजपा आमदाराचा सभागृहात गौप्यस्फोट

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाची ४ खाती बाहेरच्या व्यक्ती चालवतात एका खात्यात कर्मचारी कर्जाऊ आहेतएमएमआरडीए सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर आर . ए. राजीव यांना कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणार आहे. मग हे सरकार आपले सरकार कसे?नुकतेच कमला मिल मधील पब मध्ये रात्री उशिरापर्यंत कोरोनाचे नियम न पाळता गर्दी केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. अशाचे धाडस का होते?

मुंबई – कोरोनाकाळात ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली अशा आघाडीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस देताना प्राधान्य देण्यात येईल असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. तरीही ठाण्याचे महापौर, एक शिवसेना आमदार आणि वरळीतील इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेतली अशी माहिती भाजपा आमदार आशिष शेलारांनी विधानसभेत देऊन ठाकरे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.(BJP MLA Ashish Shelar Target Thackeray Government in Maharashtra Assembly Budget Session)

यावेळी आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र सरकार हे आपले सरकार आहे असं प्रचार करते, पण शासनाची चार खाती मंत्री किंवा अधिकारी नाही पण वेगळीच माणसे चालवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत निलांबरी, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग किर्तीकुमार केडिया हे चालवत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? तर उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे १५ ते २० कर्मचारी कर्जाऊ घेण्यात आले आहेत. मग जर शासनाची ४ खाती बाहेरच्या व्यक्ती चालवतात एका खात्यात कर्मचारी कर्जाऊ आहेत तर एमएमआरडीए सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर आर . ए. राजीव यांना कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणार आहे. मग हे सरकार आपले सरकार कसे? असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

तसेच कोरोना काळात सरकारने जे काम केले त्यावरून सरकार आपली पाट थोपटून घेतात पण या काळात खासगी रुग्णालयांनी कसे लुटले याची उदाहरणे देऊन आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्याचसोबत नुकतेच कमला मिल मधील पब मध्ये रात्री उशिरापर्यंत कोरोनाचे नियम न पाळता गर्दी केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. अशांचे धाडस का होते? याच कमला मिलमध्ये २९ डिसेंबर २०१७ रोजी लागलेल्या आगीत १४  जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी रमेश गोवानी आणि रवी भंडारी या २ मिल मालकांनी न्यायालयात जाऊन दोष मुक्त करुन घेतले. त्या विरोधात सरकारने अपील करावे अशी मागणी आम्ही केली. पण अद्याप या प्रकरणी सरकारने अपील का केले नाही? असंही शेलारांनी म्हटलं आहे.  यातूनच काही प्रवृत्ती वाढतात असे सांगत आमदार आशिष शेलार यांनी सरकारचे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली.

मेट्रो कारशेड कांजूरला नेण्यामागे जमीन मालकांचा फायदा?

मेट्रोचे कारशेड आरे मधून कांजूर मार्गला आण्याचा हट्ट केला जातोय पण यात काही जमीन मालकांच्या फायद्यासाठी करीत तर नाही ना? असे आम्ही वारंवार सांगत होतो. नुकतेच न्यायालयात सरकारने मालकांना नुकसान भरपाई देऊ असे सांगते आहे. हेच आम्ही सांगत होतो असे सांगून आमदार आशिष शेलार यांनी कांजूर मार्ग प्रकरणी सरकारच्या हेतू बाबतच शंका उपस्थित केली. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये बोगस नावे घुसवून इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या प्रकरणी पालिका  अतिरिक्त आयुक्त कंकाणी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश ही दिले आहेत, अशी माहिती आपल्या राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेत दिली.

 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Budget Session BJP MLA Ashish Shelar Criticized Thackeray Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.