Flood: “तुमचे मंत्री बोटीत फिरत होते अन् आमचे मंत्री डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरलेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 07:58 PM2021-07-23T19:58:10+5:302021-07-23T20:01:23+5:30

Raigad Flood: 'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Maharashtra Rain, Ratnagiri Flood: NCP Target BJP Chandrakant Patil over criticism on Government | Flood: “तुमचे मंत्री बोटीत फिरत होते अन् आमचे मंत्री डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरलेत”

Flood: “तुमचे मंत्री बोटीत फिरत होते अन् आमचे मंत्री डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरलेत”

googlenewsNext
ठळक मुद्देमी सकाळी ७ वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाहीउद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजेभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका, राष्ट्रवादीनं दिलं प्रत्युत्तर

मुंबई – महाराष्ट्रातील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरानं थैमान घातलं आहे. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर याठिकाणी नद्यांना आलेल्या पुरामुळे गावच्या गावं पाण्यात बुडाली आहेत. काही भागात दरडी कोसळल्याने आतापर्यंत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे. मात्र पुराच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी उत्तर दिलं आहे. ट्विटरवर क्रास्टो यांनी म्हटलंय की, पूरग्रस्त भागात बोटीत बसून तुम्ही हात दाखूवन फोटो काढून असे निर्णय घेत होते. मात्र आमच्या महाविकास आघाडीच्या मंत्री आदिती तटकरे डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरल्या आहेत. आठवणीसाठी तुमच्या सहकाऱ्यांनी टीपलेले छायाचित्रही पाहा असं म्हणत गिरीश महाजन यांचा बोटीतील फोटो अपलोड केला आहे.

मागच्या वेळच्या पुरात गिरीश महाजन पाहणी करण्यासाठी सांगली-कोल्हापूरला गेले होते तेव्हा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी गिरीश महाजनांवर टीका केली होती.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताच्या सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. पावसामुळे अनेक इमारती पाण्यात गेल्या आहेत. मात्र आमचे मुख्यमंत्री मातोश्रीत बसले आहेत. ते वर्षा निवासस्थानीही नाहीत, त्यांना मंत्रालयात यायलाही वेळ नाही. मी सकाळी ७ वाजताच मंत्रालयात जाऊन कामाला लागायचो. हा राजकारणाचा विषय नाही, पण उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत. आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत असं त्यांनी सांगितले.

आम्ही थेट फिल्डवर जायचो

पाटील पुढे म्हणाले की, जेव्हा २०१९ साली राज्यात महापूर आला होता, तेव्हा १५ दिवस पाणी ओसरत नव्हतं. मी आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) थेट फिल्डमध्ये जायचो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात होती. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली.

Web Title: Maharashtra Rain, Ratnagiri Flood: NCP Target BJP Chandrakant Patil over criticism on Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.