शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 21:50 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित शाह यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर नागपूरमध्ये परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नितीन गडकरी यांची भेट घेतली.

कमलेश वानखेडे नागपूर : महायुतीचे जागावाटप (Mahayuti Seat Sharing) अंतिम टप्प्यात असून, लवकरच भाजपची पहिली उमेदवार यादी (BJP Candidate First List) जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (ChandraShekhar Bawankule) हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या निवासस्थानी पोहचले. सुमारे दोन तास या तीनही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

फडणवीसांची गडकरींसोबत काय झाली चर्चा?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत विदर्भातील जागा वाटपासह उमेदवारांच्या नावांवर गडकरींची सहमती घेण्याचे प्रयत्न झाले. नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जागांवर गडकरींचा पगडा आहे. शिवाय गडकरींना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे येथील जागांसह उमेदवारांबाबत गडकरींचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी फडणवीस व बावनकुळे यांनी अंतिम चर्चा केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर हे देखील गडकरींच्या घरी पोहचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांच्या नावाबाबत गडकरींनी दोन्ही नेत्यांना काही जागांवर महत्वपूर्ण सूचनाही केल्याची माहिती आहे.

रामटेकचे भाजप पदाधिकारी देवगिरीवर

रामटेकमध्ये आमदार आशिष जयस्वाल हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केल्यानंतर भाजपाचे माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी बंड पुकारले आहे. भाजपाने तडकाफडकी कारवाई करीत रेड्डी यांना निलंबित केले. 

या कारवाईमुळे नाराज झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत सामूहिक राजीनामे दिले. या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांना शनिवारी (१९ ऑक्टोबर) रात्री देवगिरीवर बोलावण्यात आले. उपमुख्य देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढली व महायुतीला साथ देण्याची सूचना केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरी